मुंबई - अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी शुक्रवारी रात्री मुंबईत सैफ अली खान आणि अमृता सिंगचा मुलगा इब्राहिम अली खानसोबत स्पॉट झाली. याआधी या कलाकारांना कधीही एकत्र पाहिले गेले नव्हते आणि त्यांच्या एकत्र दिसल्याने डेटिंगच्या अफवा पसरल्या आहेत.
इब्राहिम आणि पलक मुंबईच्या वांद्रे भागात एका आलिशान हँगआउट ठिकाणाहून बाहेर पडताना एकत्र स्नॅप झाले. दोघांचे फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाल्यानंतर लगेचच सोशल मीडियावर डेटिंगच्या अफवा पसरल्या आहेत.
रिपोर्ट्सनुसार, इब्राहिम अली खान आपल्यासोबत पलक तिवारीला डिनर डेटवर घेऊन गेला आणि कॅफेमधून बाहेर येत असताना क्लिक झाला. या दोघांनी रेस्टॉरंटमधून स्वतंत्रपणे बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि पलक नंतर इब्राहिमसोबत कारमध्ये बसताना तिचा चेहरा लपवत असताना कॅमेऱ्यात कैद झाली.