पुणे- 'दबंग' आणि 'दबंग २' या दोन्ही चित्रपटांना मिळालेल्या तुफान यशानंतर आता या चित्रपटाचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच 'दबंग ३'च्या चित्रीकरणाला सुरूवात झाली असून सध्या सलमान आणि सोनाक्षी चित्रीकरणासाठी पुण्यातील फलटणमध्ये दाखल झाले आहेत.
VIDEO: 'दबंग ३'चं पुण्यातील चित्रीकरण सुरू, सलमान-सोनाक्षीला पाहण्यासाठी चाहत्यांची झुंबड - phaltan
सलमान आणि सोनाक्षी चित्रीकरणासाठी पुण्यातील फलटणमध्ये दाखल झाले आहेत. याठिकाणी दोघांच्याही चाहत्यांनी त्यांना पाहण्यासाठी एकच गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले.
याठिकाणी दोघांच्याही चाहत्यांनी त्यांना पाहण्यासाठी एकच गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. इतर दोन्ही भागांप्रमाणेच या भागातही सलमान चुलबूल पांडे नावाच्या पोलिसाच्या भूमिकेत झळकणार आहे. तर सोनाक्षी रज्जो म्हणजेच सलमानच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे.
नृत्य दिग्दर्शक प्रभूदेवा या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे. चित्रपटात सोनाक्षी आणि सलमानशिवाय अरबाज खान, माही गिल आणि दाक्षिणात्य कलाकार सुदीप विलनदेखील महत्त्वाच्या भूमिका साकारणार आहेत. तर विनोद खन्ना यांचे भाऊ प्रमोद खन्ना चित्रपटात सलमानच्या वडिलांच्या भूमिकेत दिसतील. हा सिनेमा येत्या २० डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.