महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

चप्पल कुठून घेतलीस? रणबीरचा छायाचित्रकाराला प्रश्न - brahmastra

रणबीर विमानतळावर दिसताच छायाचित्रकारांनी गर्दी केली. यानंतर रणबीरने एका छायाचित्रकाराला चप्पल कुठून घेतलीस असा प्रश्न केला

मुंबई विमानतळावर स्पॉट झाला रणबीर

By

Published : Apr 3, 2019, 9:59 AM IST

मुंबई- बॉलिवूड कलाकार कुठेही दिसले की मीडियाचे कॅमेरे लगेचच त्यांना घेरतात. निश्चितच यानंतर ते कलाकारांना अनेक उलट-सुलट प्रश्न करत असतात. मात्र, असेच प्रश्न जर कलाकरांनीच कॅमेरामनला विचारले तर.. अशीच फिरकी नुकतीच रणबीरने एका कॅमेरामनची घेतली आहे.

रणबीर विमानतळावर दिसताच छायाचित्रकारांनी गर्दी केली. यानंतर रणबीरने एका छायाचित्रकाराला चप्पल कुठून घेतलीस असा प्रश्न केला. यावर छायाचित्रकाराने अंधेरी स्टेशनवरून असं उत्तर दिलं. त्याने उत्तर देताच रणबीरने अच्छी हैं अशी प्रतिक्रिया दिली.

रणबीरचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रणबीर लवकरच 'ब्रह्मास्त्र' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत आलिया भट्ट आणि अमिताभ बच्चनदेखील महत्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details