मुंबई- बॉलिवूड कलाकारांच्या चाहत्यांची संख्या कमी नसते. अनेक चाहते तर या कलाकारांची एक झलक पाहण्यासाठी जीव धोक्यात टाकायलाही तयार असतात. अशात आपल्या आवडत्या कलाकाराला भेटून त्याला भेटवस्तू देणं, ही बाब चाहत्यांसाठी नक्कीच आनंदाची असते.
अन् चक्क गिफ्ट घेऊन आलेल्या चाहत्याला रणबीरनं बसवलं पायाशी
रणबीर समोर येताच या चाहत्यानं त्याला गिफ्ट देत त्याचे पाय धरले. यानंतर रणबीरनं सोफ्यावर बसून गिफ्ट उघडण्यास सुरूवात केली. यावेळी रणबीरचा चाहता त्याच्या पायापाशी बसला होता
मात्र, चाहत्यांनी दिलेल्या या भेटवस्तूची आणि त्यांच्या या भावनांची कदर या कलाकारांना खरंच असते का? असा प्रश्न अनेकदा पडतो. अशात रणबीरनं केलेल्या एका प्रकारामुळे तो सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. रणबीरचा एक चाहता त्याला भेटण्यासाठी गिफ्ट घेऊन आला होता.
रणबीर समोर येताच या चाहत्यानं त्याला गिफ्ट देत त्याचे पाय धरले. यानंतर रणबीरनं सोफ्यावर बसून गिफ्ट उघडण्यास सुरूवात केली. यावेळी रणबीरचा चाहता त्याच्या पायापाशी बसला होता, असं असतानाही रणबीरनं एकदाही त्याला सोफ्यावर बसण्यासाठी न म्हणता त्याला तिथेच बसवून ठेवलं. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून याच घटनेमुळे रणबीर काय देव आहे का? असं म्हणत नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केलं आहे.