महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

VIDEO: 'छपाक'च्या सेटवरील दीपिकाचा व्हिडिओ व्हायरल - acid attack

या व्हिडिओमध्ये दीपिका विक्रांत मेस्सीसोबत दिसत आहे. दोघेही बाईकवर स्पॉट झाले आहेत. विक्रांत या चित्रपटात लक्ष्मीच्या पतीची भूमिका सााकरणार आहे

छपाकच्या सेटवरील व्हिडिओ व्हायरल

By

Published : Apr 10, 2019, 4:17 PM IST

मुंबई- अभिनेत्री दीपिका पदुकोण लवकरच 'छपाक' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात ती अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अगरवालच्या भूमिकेत झळकणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटातील दीपिकाचा एक फोटो शेअर करण्यात आला होता. यापाठोपाठ आता चित्रपटातील एक व्हिडिओही समोर आला आहे.

या व्हिडिओमध्ये दीपिका विक्रांत मेस्सीसोबत दिसत आहे. दोघेही बाईकवर स्पॉट झाले आहेत. विक्रांत या चित्रपटात लक्ष्मीच्या पतीची भूमिका सााकरणार आहे. दीपिकाचे चाहते तिला या भूमिकेत पाहण्यासाठी उत्सुक आहेत. एका अॅसिड हल्यातील पीडित मुलीची भूमिका साकारणे दीपिकासाठी नक्कीच आव्हानात्मक आहे.

मेघना गुलजार या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. यापूर्वी त्यांनी 'राजी' चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. अलिकडेच या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. आता सर्वांचे लक्ष त्यांच्या 'छपाक' चित्रपटाकडे लागले आहे. पुढील वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होईल.

ABOUT THE AUTHOR

...view details