मुंबई - अभिनेता कार्तिक आर्यन आणि चित्रपट निर्माते करण जोहर यांच्यात झालेल्या वादाने चंदेरी दुनियेत वादळ निर्माण झाले. दोन्ही बाजूंनी याबद्दल आपली बाजू मांडण्यासाठी मीडियाचा आधार अद्यापही घेतलेला नाही. त्यामुळे ऐकीव आणि तर्कावर आधारित बातम्या वेबलॉईडवर चर्चेत आहेत.
पूर्वी आलेल्या रिपोर्टमधून याला कार्तिक आर्यनचे अनप्रोफेशनल वागणे जबाबदार असल्याचे सांगितले जात होते. अलिकडील रिपोर्टनुसार 'दोस्ताना २' मधून काढून टाकणे या पलिकडे नजरेला न दिसणाऱ्या काही गोष्टी आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार कार्तिकने २०१९ मध्ये 'दोस्ताना २' साठी २ ते ३ कोटी रुपयांची रक्कम साईन केली होती. परंतु जेव्हा चित्रपटाचे शुटिंग सुरू झाले तेव्हा त्याची मार्केट व्हॅल्यू १० कोटींची झाली होती. त्यामुळे आपली फी वाढवावी अशी मागणी कार्तिक निर्माता करण जोहरकडे करीत होता. परंतु शुटिंग सुरू असताना अशी मागणी करणे करणला अनप्रोफेशनल वाटत होते. तथापि, करण जोहरने भरपाई करुन देण्यासाठी 'मिस्टर लेले' या चित्रपटासाठी कार्तिकला ऑफर दिली होती आणि ती त्याने मान्यही केली होती.
कार्तिक आणि करण यांच्यातील संबंध तेव्हा बिघडले जेव्हा कार्तिकच्या जागी विकी कौशलची निवड करण्यात आली. याची कार्तिकला कल्पनाही देण्यात आली नव्हती. धर्मा प्रॉडक्शनवर नाराज असलेल्या कार्तिकला याचा मोठा धक्का बसला. कारण धर्माने शशांक खेतानचा 'योध्दा' हा चित्रपट शाहिद कपूरला दिला होता आणि जेव्हा त्याने हा चित्रपट सोडला त्यानंतर त्याच्याशी कोणताच संपर्क धर्माच्या वतीने करण्यात आला नव्हता.
धर्मा प्रॉडक्शनवर चिडलेल्या कार्तिक आर्यनने आपला फोकस 'धमाका' या चित्रपटावर ठेवला आणि 'दोस्ताना २' साठी तारखा देताना टाळाटाळ सुरू केली. त्यामुळे करण जोहर नाराज झाला होता. 'मिस्टर लेले'नंतर करणने कार्तिकला क्रिकेटवर आधारित शरण शर्मा यांच्या एका नव्या चित्रपटाचीही ऑफर दिली होती. परंतु कार्तिकने अट घातली की तो 'दोस्ताना २' च्या शूटसाठी तेव्हा परत येईल जेव्हा शरण शर्माच्या चित्रपटाचा करार होईल. कार्तिकला वाटले की कामासाठी त्याला अत्यंत कमी पगाराची मजुरी देण्यात आली आहे आणि त्याचा विश्वासघात करण्यात आला आहे. करण जोहरने विचार केला की कार्तिकचे हे वागणे अत्यंत अनप्रोफेशनल आहे आणि त्यामुळे दोघांच्यातील संबंध ताणले गेले.
हेही वाचा - कंडोम परिक्षकाची भूमिका साकारणार रकुल प्रीत सिंह