मुंबई: प्रियंका चोपड़ा ने गुरुवार को जामिया मिलिया इस्लामिया और अलीगढ़ मुस्लिम विश्वविद्यालय के छात्रों के खिलाफ पुलिस की कार्रवाई पर अपनी चुप्पी तोड़ते हुए कहा कि एक संपन्न लोकतंत्र में, शांतिपूर्ण प्रदर्शनकारियों के खिलाफ हिंसा "गलत" है.
मुंबई - नागरिकता सुधारणा कायद्याला विरोध करणाऱ्या दिल्लीतील विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. यात अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाले होते. शांतीच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्यांवर हिंसा करणे चुकीचे असल्याचे मत बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राने व्यक्त केले आहे.
प्रियंकाने आपल्या ट्विटमध्ये लिहिलंय, "प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण हे आपले स्वप्न आहे. स्वतंत्रपणे जगण्याचा विचार करण्यासाठी शिक्षण सशक्त बनवते. आम्ही त्यांची वाढ अशीच केली आहे की ज्यातून आवाज उठवला जाईल."
प्रियंका पुढे म्हणते, "एका संपन्न लोकशाहीमध्ये शांततेच्या मार्गाने उठवलेला आवाजाला हिंसेने दाबने चुकीचे आहे. प्रत्येक आवाज महत्त्वाचा आहे. प्रत्येक आवाज देश बदलण्याच्या दिशेने काम करेल."
सीएए कायद्याच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला अनेक बॉलिवूड कलाकारांनी पाठिंबा दिलाय. यात अभिनेता फरहान अख्तर, ऋतिक रोशन, मोहम्मद जीशान अय्यूब, परिणीति चोप्रा, सिद्धार्थ मल्होत्रा, दिग्गज पटकथा लेखक जावेद अख्तर, फिल्म निर्माता विशाल भारद्वाज आणि अनुराग कश्यप यांचा समावेश आहे.