मुंबई -टीव्ही निर्माता विकास गुप्ता यांनी दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूतची माजी मैत्रीण अंकिता लोखंडे हिला त्याचा ‘शॉक अॅब्सॉर्बर’ म्हटले आहे.
हे दोन्ही कलाकार ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत एकत्र दिसले होते. गुरुवारी सकाळी सुशांतची पहिली टीव्ही मालिका 'किस देश में है मेरा दिल' चे क्रिएटिव्ह दिग्दर्शक विकास गुप्ता यांनी त्यांच्यासाठी एक भावनिक पोस्ट लिहिली आहे.
विकास यांनी ‘पवित्र रिश्ता’च्या सेटवरील एक फोटो शेअर करत लिहिलंय, ''याच वेळी जेव्हा मी सुशुला, निश्चिंत, मजेत आणि आनंदी पाहिला होता. त्याला कशाचीही चिंता नव्हती. तो भारतीय टेलिव्हिजनवर प्रथम क्रमांकाचा कार्यक्रम सोडू शकत होता आणि आम्ही काही आठवडे काही न करता, केवळ चहा, कॉफी आणि बिस्किटांवर योजना बनवित होतो. चित्रपट बनवण्याच्या योजनांवर चर्चा करायचो. मला आठवतेय की, त्याने 'औरंगजेब'ला नाही म्हटले होते कारण त्याला भावाचा रोल मिळाला होता. मला आठवतेय त्याने मला विचारले की, यश राजला नाही कसे सांगू, परंतु हे त्याने केले कारण या फोटोत मधोमध दिसणारी जी वेडी मुलगी आहे तिने सुशांतला सांगितले की, तू तेच कर ज्याच्यात तुला आनंद मिळेल. कोणत्या गोष्टीच्याबाबतीत खात्री असते तेव्हाच निर्णय घे. अंकिताचे हे ऐकून तेव्हा तसेच हासायला लागला जसा की तो या फोटोत हसतोय.''
विकास पुढे लिहितात, ''परिणीती चोप्रासोबत त्याला सिनेमा मिळावा अशी आमची इच्छा होती कारण त्याने 'इश्कजादे'मध्ये एक अद्भुत काम केले होते. या शोबद्दल त्याला सांगणे इतके मोठे ठरले की त्याला 'काय पो छे' सिनेमा मिळाला आणि त्याने मला 'पीके' सिनेमा साईन केल्याचे सांगितले होते. त्याने 'शुद्ध देसी रोमांस' चित्रपट परिणीतीसोबत साईन केल्याचेही सांगितले होते. या आनंदात अंकिताने मित्रांना आपल्या घरी बोलवले होते. आता फक्त आठवणी उरल्या आहेत.''