मुंबई- शकुंतला देवी हे नाव आजही अनेकांसाठी अनोळखी आहे, कारण हे नाव लोकांपर्यंत कधी पोहचलंच नाही. म्हणूनच ह्युमन कॉम्प्युटर, अशी ओळख असणाऱया शकुंतला देवींची कथा आता मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे. नुकतीच या चित्रपटाविषयी अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
ह्युमन कॉम्प्युटर शकुंतला देवींचा प्रवास पडद्यावर, विद्या बालन साकारणार भूमिका - human computer
१८ जून १९८० मध्ये शकुंतला देवींना दोन संख्या गुणाकारासाठी देण्यात आल्या. हे आकडे लंडनच्या इम्पिरियल कॉलेजच्या संगणक विभागाने निवडले होते. त्यांनी या दोन आकड्यांचा अचूक गुणाकार करून दाखवत केवळ २८ सेकंदांमध्ये हे उत्तर दिलं.
यात विद्या बालन शकुंतला देवींची भूमिका साकारणार आहे. शकुंतला देवींनी आपली बुद्धीमत्ता आणि गणितीय कौशल्याचे वेगवेगळे चमत्कार दाखवून संपूर्ण जगाला चक्रावून सोडले. १८ जून १९८० मध्ये त्यांना दोन संख्या गुणाकारासाठी देण्यात आल्या. हे आकडे लंडनच्या इम्पिरियल कॉलेजच्या संगणक विभागाने निवडले होते. त्यांनी या दोन आकड्यांचा अचूक गुणाकार करून दाखवत केवळ २८ सेकंदांमध्ये हे उत्तर दिलं.
यामुळेच ह्युमन कॉम्प्युटर, अशी त्यांची ओळख निर्माण झाली. दरम्यान त्यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाचे दिग्दर्शन अनु मेनन हे करणार आहेत. यावर्षीच चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात होणार असून २०२० च्या उन्हाळ्यात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.