मुंबई- बॉलिवूडचा किंग खान आणि किंग ऑफ रोमान्स अशी ओळख असलेल्या शाहरुखसोबत काम करण्याची प्रत्येकाची इच्छा असते. अशात नुकतंच मिशन मंगल चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या विद्यानेही हीच इच्छा व्यक्त केली आहे. विद्या बालनने शाहरुखसोबत आतापर्यंत केवळ दोन गाण्यांमध्ये काम केलं आहे.
विद्यानं व्यक्त केली बॉलिवूडच्या किंग खानसोबत काम करण्याची इच्छा - शाहरुख खान
आपल्या १४ वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये ती एकदाही शाहरुखसोबत चित्रपटासाठी स्क्रीन शेअर करताना दिसली नाही. मात्र, दोन गाण्यात हे कलाकार एकत्र झळकले आहेत. यात ओम शांती ओममधील दिवानगी आणि बेबीमधील शाहरुखचा स्पेशल अपीरियन्स यांचा समावेश आहे.
आपल्या १४ वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये ती एकदाही शाहरुखसोबत चित्रपटासाठी स्क्रीन शेअर करताना दिसली नाही. मात्र, दोन गाण्यात हे कलाकार एकत्र झळकले आहेत. यात ओम शांती ओममधील दिवानगी आणि हे बेबीमधील शाहरुखचा स्पेशल अपीरियन्स यांचा समावेश आहे.
नुकतंच दिलेल्या एका मुलाखतीत विद्या म्हणाली, शाहरुखला पहिल्यांदा भेटली तेव्हा माझ्या पाया खालची जमीनच सरकली होती. शाहरुखची पर्सनालिटी खूपच चार्मिंग आहे. एखादी चांगली स्क्रीप्ट मिळाली, तर आपल्याला शाहरुखसोबत काम करायला आवडेल, असं ती म्हणाली.