महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

विद्यानं केली 'ह्यूमन कॉम्प्युटर' शकुंतला देवींच्या बायोपिकला सुरुवात, पाहा मोशन पोस्टर - vidya balans upcoming movie

ह्युमन कॉम्प्युटर, अशी ओळख असणाऱया शकुंतला देवींची कथा आता मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे. विद्या बालन या सिनेमात शकुंतला देवींची भूमिका साकारणार आहे. आजपासून या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली

शकुंतला देवींच्या बायोपिकला सुरुवात

By

Published : Sep 16, 2019, 11:20 AM IST

मुंबई - शकुंतला देवी हे नाव आजही अनेकांसाठी अनोळखी आहे, कारण हे नाव लोकांपर्यंत कधी पोहचलंच नाही. म्हणूनच ह्युमन कॉम्प्युटर, अशी ओळख असणाऱया शकुंतला देवींची कथा आता मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे. विद्या बालन या सिनेमात शकुंतला देवींची भूमिका साकारणार आहे.

आजपासून या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. चित्रपटाचं एक मोशन पोस्टर प्रदर्शित करत याबद्दलची माहिती देण्यात आली आहे. यात विद्याचा शकुंतला यांच्या पात्रातील लूक पाहायला मिळत आहे. २०२० ला उन्हाळ्यात हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनु मेनन करत आहेत.

कोण आहेत शकुंतला देवी -

शकुंतला देवींनी आपली बुद्धीमत्ता आणि गणितीय कौशल्याचे वेगवेगळे चमत्कार दाखवून संपूर्ण जगाला चक्रावून सोडले.१८ जून १९८० मध्ये त्यांना दोन संख्या गुणाकारासाठी देण्यात आल्या. हे आकडे लंडनच्या इम्पिरियल कॉलेजच्या संगणक विभागाने निवडले होते. त्यांनी या दोन आकड्यांचा अचूक गुणाकार करून दाखवत केवळ २८ सेकंदांमध्ये हे उत्तर दिलं. यामुळेच ह्युमन कॉम्प्युटर, अशी त्यांची ओळख निर्माण झाली.

ABOUT THE AUTHOR

...view details