मुंबई- बॉलिवूड अभिनेता विकी कौशलने उरी आणि मनमर्जियासारख्या चित्रपटातून प्रेक्षकांची मने जिंकली. या चित्रपटाच्या यशानंतर विकीला अनेक चाहतेही मिळाले. या चाहत्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असतानाच आता त्याच्या महिला चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
विकी कौशलने दिली खूशखबर; महिला चाहत्या होणार आनंदी - uri
विकी आणि हरलीनच्या ब्रेकअपचं कारण विकीची कॅटरिनासोबतची वाढती जवळीकता असल्याचे म्हटले जात आहे
ही आनंदाची बातमी अशी की, आता आपण सिंगल असल्याचे विकीने जाहीर केले आहे. उरीच्या प्रदर्शनावेळी विकीचे नाव हरलीन सेठीसोबत जोडले जात होते. मात्र, काही काळातच त्यांच्या ब्रेकअपविषयीच्या बातम्या समोर आल्या. आता विकीने स्वतः या वृत्ताला दुजोरा देत आपण सिंगल असल्याचे म्हटले आहे.
विकी आणि हरलीनच्या ब्रेकअपचं कारण विकीची कॅटरिनासोबतची वाढती जवळीकता असल्याचे म्हटले जात आहे. चित्रपटांविषयी बोलयचं झालं तर, विकी कौशल नुकताच 'उरी - द सर्जिकल स्ट्राईक' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २०० कोटींची कमाई केली होती. यानंतर आता तो 'तख्त' चित्रपटात झळकणार आहे.