मुंबई- अभिनेता विकी कौशल सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलाय. उरी - द सर्जिकल स्ट्राईक चित्रपटाला मिळत असलेल्या प्रतिसादामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. यापूर्वी त्याच्या मसान आणि संजू चित्रपटातील भूमिकांचे कौतुक झाले होते. मात्र उरीमुळे तो अधिक गाजतोय.
विकी कौशलचे फिमेल फॉलोअर्स प्रचंड असले तरी तो पूर्वीच एकीच्या प्रेमात पडलाय. टीव्ही अभिनेत्री हरलीन सेठी सोबत त्याचे अफेअर सुरू आहे. खॉफी विथ करण शोमध्ये त्याने याची कबुली दिली होती. हरलीनसोबत डेटींग करीत असल्याचे त्याने आपल्या आई वडिलांना सांगितले त्याचा किस्सा त्याने एका शोमध्ये सांगितला.
काही दिवसांपूर्वी तो ‘फेमसली फिल्मफेयर’ या शोच्या मंचावर आला होता. यावेळी त्याने अनेक विषयांवर भाष्य केले. उरीनंतर त्याला भेटणारे फ्ॅन्स, त्यांच्या प्रतिक्रिया याबद्दल त्याने सांगितले. आपल्या प्रेयसीबद्दल घरच्यांची प्रतिक्रियाही त्याने रंजकपणे सांगितली.
आपला मुलगा कोण्यातरी मुलीच्या प्रेमात पडलाय याचा अंदाज विकीच्या आईला आला होता. एके दिवशी त्याने हिंमत करुन याबद्दल आईला सांगितले. कामावरुन तो जेव्हा घरी परतला तेव्हा आई आणि वडील त्याची वाट पाहात होते. त्याला याचे गांभीर्य लक्षात आले. वडिलांनी त्याला बोलावले आणि त्या मुलीविषयी विचारले. त्याने पुन्हा सविस्तरपणे आईला सांगितलेली गोष्ट सांगितली. वडील इतकेच म्हणाले, की तुझे वय आहे. ठीक आहे, आम्ही तुझ्यासोबत आहोत. त्या मुलीचा नीट आदर कर.
या मुलाखतीत त्याने अनेक रंजक गोष्टींचा उलगडा केला आहे. फिल्मफेरच्या ट्विटर हँडलवर हा व्हिडिओ सेअर करण्यात आलाय. सविस्तर चर्चा तुम्ही पाहू शकता.