जयपूर (राजस्थान)- राजस्थानमध्ये सेलिब्रिटी कपल विकी कौशल आणि कॅटरिना कैफ यांच्या लग्नाच्या जल्लोषाला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे, या साही विवाह सोहळ्यास उपस्थित असलेल्या पाहुण्यांसाठी स्वागत पत्राचा फोटो मंगळवारी दुपारपासून इंटरनेटवर फिरत आहे.
"तुम्ही अखेर आला आहात! आम्ही आशा करतो की तुम्ही जयपूर ते रणथंबोर या रस्त्याच्या सहलीचा आनंद घ्याल. निसर्गरम्य खेडे आणि रस्त्यांवरून तुमचा प्रवास करताना, कृपया आमच्या अल्पोपहाराचा आनंद घ्या. शांत बसा, आराम करा आणि आनंदाने भरभरून जा. रोमांचक साहस!", असे पत्रामध्ये लिहिले आहे.
विकी कॅटरिनाच्या लग्नाचे स्वागत पत्र व्हायरल स्वागत पत्रामध्ये, लग्नाच्या आयोजकांनी आमंत्रितांना विनंती केली आहे की त्यांनी सोशल मीडियावर विवाहाशी संबंधित कोणतेही फोटो पोस्ट करू नयेत.
"आम्ही तुम्हाला विनंती करतो की कृपया तुमचे मोबाईल फोन तुमच्या संबंधित खोल्यांमध्ये ठेवा आणि कोणत्याही समारंभ आणि कार्यक्रमासाठी फोटो पोस्ट करणे किंवा सोशल मीडियाचा वापर करणे टाळा. आम्ही तुम्हाला भेटण्यासाठी आतुर आहोत! शुभेच्छा, शादी पथक," असे पत्रामध्ये पुढे लिहिले आहे. .
यापूर्वी विकी-कॅटरिनाच्या लग्नाच्या ठिकाणचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. चित्रित केलेल्या व्हिडिओ क्लिपमध्ये भव्य स्थळाची झलक दिसली आहे जिथे विकी आणि कॅटरिनाच्या लग्नाचा उत्सव आज रात्री संगीत समारंभाने सुरू होईल.
विकी आणि कॅरिना ९ डिसेंबरला सिक्स सेन्स फोर्ट बरवारा येथे लग्नबंधनात अडकणार आहेत.
हेही वाचा - Vicky Katrina Wedding: बहिणी राहणार लग्नाला हजर, पण सलमान गैरहजर..जाणून घ्या कारण