महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

Vicky Katrina wedding: बहिणी राहणार लग्नाला हजर, पण सलमान गैरहजर..जाणून घ्या कारण - सलमान कॅटरिनाच्या लग्नाला गैरहजर

सुपरस्टार सलमान खानच्या बहिणी (salman khan sisters to attend katrina kaif wedding)अलविरा खान आणि अर्पिता खान शर्मा त्यांच्या पतीसह विकी कौशल आणि कॅटरिना कैफ यांच्या लग्नाला उपस्थित राहणार आहेत. सुपरस्टार सलमान आणि कॅटरिनाच्या नात्याची पूर्वी खूप चर्चा झाली होती. तो विकॅटच्या लग्नाला गैरहजर राहणार आहे.

कॅटरिना कैफ आणि विकी कौशल विवाह
कॅटरिना कैफ आणि विकी कौशल विवाह

By

Published : Dec 7, 2021, 7:40 PM IST

मुंबई (महाराष्ट्र) - कॅटरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या बहुचर्चित लग्नाला (Vicky Katrina wedding) सलमान खान उपस्थित राहणार का याबद्दलचा सस्पेन्स वाढताना दिसत आहे. सलमानचे कुटुंब या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. सलमान खानच्या बहिणी अर्पिता आणि अलविरा कॅटरिनाच्या जवळच्या असल्याचे बोलले जाते.

कुटुंबातील जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघी बहिणी त्यांच्या पतीसह लग्नाला उपस्थित राहणार आहेत. अर्पिताचा पती आणि आयुष शर्मा आणि अल्वीराचा पती अभिनेता-दिग्दर्शक अतुल लग्नाला हजर राहतील असे समजते.

सलमानच्या बहिणींसोबत कॅटरिनाचे चांगले संबंध

सलमानच्या पालकांनी या समारंभाला हजेरी लावावी आणि नवविवाहित जोडप्याला आशीर्वाद द्यावेत अशी कॅटरिनाची इच्छा होती. परंतु आरोग्याच्या चिंतेमुळे ते या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकणार नाहीत.

सलमानच्या बहिणींसोबत कॅटरिनाचे चांगले संबंध

सलमान खानच्या दबंग कॉन्सर्ट टूरच्या तारखा आणि विकॅटच्या लग्नाच्या तारखा क्लॅश झाल्यामुळे सलमान हजर राहणार नाही. 10 डिसेंबर रोजी रियाध येथे सलमानचा दबंग कॉन्सर्ट होणार आहे. रविवारी तो जॅकलिन फर्नांडिससोबत दुबईला रवाना झाला आहे. दरम्यान सलमानचा सुरक्षा प्रमुख शेरा सिक्स सेन्स फोर्ट बरवारा येथे कॅटविक लग्नाच्या सुरक्षेची काळजी घेत आहे.

हेही वाचा - Vicky Katrina Wedding Video Leaked : कडेकोट बंदोबस्तात असतानाही, विकी कॅटरिनाच्या विवाहस्थळावरील व्हिडिओ लीक

ABOUT THE AUTHOR

...view details