मुंबई- पद्मभूषण पुरस्कार विजेते प्रसिद्ध संगीतकार मोहम्मद जहूर खय्याम हाश्मी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. फुफ्फुसाच्या संसर्गामुळे त्यांना सुजय रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल केले असून खय्याम यांची प्रकृती सध्या गंभीर आहे.
पद्मभूषण विजेते संगीतकार खय्याम अतिदक्षता विभागात, प्रकृती गंभीर - पाव पडू तोरे श्याम
खय्याम यांना १९७७ मध्ये ‘कभी कभी’ आणि १९८२ मध्ये ‘उमराव जान’मधील संगीतासाठी फिल्मफेअर पुरस्काराने, २००७ साली संगीत नाटक अकादमी पुरस्काराने आणि २०११ मध्ये ‘पद्मभूषण’ पुरस्काराने गौरवण्यात आले.
खय्याम यांना १९७७ मध्ये ‘कभी कभी’ आणि १९८२ मध्ये ‘उमराव जान’मधील संगीतासाठी फिल्मफेअर पुरस्काराने, २००७ साली संगीत नाटक अकादमी पुरस्काराने आणि २०११ मध्ये ‘पद्मभूषण’ पुरस्काराने गौरवण्यात आलं. २०१० मध्ये फिल्मफेअरने जीवनगौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित केलं.
साठ वर्षांच्या कारकीर्दीत ७१ चित्रपट आणि ९ दूरदर्शन मालिकांना त्यांनी संगीत दिलं आहे. चित्रपटांशिवाय खय्याम यांच्या अल्बम साँगलाही श्रोत्यांची तुफान पसंती मिळाली. यात 'पाव पडू तोरे श्याम', 'लोट चलो' आणि 'गजब किया तेरे वादे पे ऐतबार किया'सारख्या गाण्यांचा समावेश आहे.