मुंबई- बॉलिवूड अभिनेता वरुण धवनने साऊथ स्टार समंथा रुथ प्रभूला हौशी फोटोग्राफर्सच्या घेरावातून वाचवले. समंथा आजकाल मुंबईत रहात आहे. जेव्हा ती वरुणसोबत चित्रपट निर्माते राज आणि डीके यांना भेटण्यासाठी बाहेर पडली तेव्हा फोटो ग्राफर्सनी तिला घेराव घातला. या अशा पापाराझी संस्कृतीशी समंथा परिचित नाही. या प्रसंगातून वरुणने तिला सही सलामत बाहेर काढले. कारण खूप जवळ येऊन हे लोक फोटो काढत होते.
या घटनेच्या व्हायरल व्हिडिओमध्ये वरुण सामंथाचे गर्दीपासून संरक्षण करताना आणि पापाराझींना तिला घाबरवू नका असे सांगताना दिसत आहे. पॅप्स जवळ आल्यावर वरुण म्हणाला, "डराओ मत, क्यूँ डरा रहे हो इसको?'' वरूणच्या या प्रसंगावधानाने नेटिझन्सची मने जिंकली आहेत. सर्वजण वरुणचे कौतुक करीत आहेत.