महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

डेविड धवनच्या 'कुली नंबर १'च्या सिक्वलमध्ये झळकणार वरूण-साराची जोडी - comedy

या चित्रपटात वरूण धवन मुख्य भूमिकेत झळकणार आहे. तर त्याच्या अपोझिट सारा अली खानची वर्णी लागली आहे

'कुली नंबर १'मध्ये झळकणार वरूण-सारा

By

Published : Apr 24, 2019, 12:33 PM IST

Updated : Apr 24, 2019, 12:44 PM IST

मुंबई- गोविंदा आणि करिश्मा कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेला 'कुली नंबर १' चित्रपट १९९५ मध्ये प्रदर्शित झाला. डेविड धवन यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. ज्यानंतर आता डेविड धवन याच चित्रपटाचा सिक्वल घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.

या चित्रपटात वरूण धवन मुख्य भूमिकेत झळकणार आहे. तर त्याच्या अपोझिट सारा अली खानची वर्णी लागली आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी याबद्दलची अधिकृत घोषणा केली आहे. येत्या ऑगस्ट महिन्यात या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात होणार आहे.

वरूण याआधीही डेविड धवन यांच्या 'मैं तेरा हीरो' आणि 'जुड़वा 2 ' सारख्या सिनेमांत झळकला होता. हे दोन्ही चित्रपट हिट ठरले. त्यामुळे, आता या चित्रपटाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दरम्यान या चित्रपटाच्या निमित्ताने सारा आणि वरूणची जोडी पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

Last Updated : Apr 24, 2019, 12:44 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details