महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

Urmila Matondkar Defends SRK : 'ईश्वर अल्लाह तेरे नाम...असे म्हणत उर्मिलाने शाहरुखच्या ट्रोलर्सना दिले उत्तर - उर्मिलाने शाहरुखच्या ट्रोलर्सना दिले उत्तर

अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने ट्विट करत शाहरुख खानचे समर्थन केले आहे. “ईश्वर अल्लाह तेरे नाम, सबको सन्मति दे भगवान, अशा आशयाचे ट्विट ( Urmila Matondkar about shah rukh khan dua ) करत तिने शाहरुखला (Trolling SRK) ट्रोल करणाऱ्याचा ( Urmila Matondkar Defends SRK ) चांगलाच समाचार घेतला आहे.

urmila
urmila

By

Published : Feb 7, 2022, 6:56 PM IST

मुंबई -काल गानसम्राज्ञी लता मंगेशकरच्या निधनानंतर अंतिम विधीआधी त्यांचे पार्थिव शिवाजी पार्कवर ठेवण्यात आले होते. तिथे अनेक मान्यवरांनी तिला श्रद्धांजली वाहिली. राजकीय नेते आणि चित्रपटसृष्टी आणि क्रिकेटमधील सेलेब्रिटीजनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा (PM pays tribute to Lata Mangeshkar) लता दीदींना श्रद्धांजली वाहण्यासाठी जातीने हजर होते. सचिन तेंडुलकर याने पत्नी अंजलीसह दीदींना आदरांजली वाहिली. तसेच बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानने सुद्धा आपल्या धर्मातील प्रथेप्रमाणे लता दीदीला श्रद्धांजली वाहिली. परंतु ज्या पद्धतीने त्याने श्रद्धांजली वाहिली त्यासाठी तो सोशल मीडियावर (Trolling SRK) मोठ्या प्रमाणात ट्रोल झाला. या ट्रोल होण्यामागचे कारणही तसेच आहे.

शाहरुखने दुआ मागितल्यावर आपला मास्क खाली करून तोंडाने एक क्रिया केली. त्याला अनेक लोकांनी थुंकणे असे म्हटले आहे आणि त्यामुळेच शाहरुखला ट्रोलिंगला सामोरे जावे लागत आहे. शाहरुखच्या या पद्धतीवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. शाहरुख लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर थुंकला असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. आदरणीय भारतरत्न लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर अशी क्रिया करणे कितपत योग्य आहे असा सवाल विचारला जाऊ लागला आहे. काही दिवसांपूर्वी काही रेस्टॉरंट्समध्ये तंदूरी रोटी बनविताना त्या पिठात थुंकल्याबद्दल त्या रोटी बनविणाऱ्या कामगाराला अटक करण्यात आली होती. मुस्लिम धर्मात त्यातील प्रथेप्रमाणे हे ‘जायझ’ आहे अशी पाठराखण त्या धर्मातील काही लोकांनी केली होती. आणि म्हणूनच सध्या कोव्हीड प्रोटोकॉल असताना शाहरुख खान ने मास्क खाली केला आणि थुंकण्याची क्रिया केली म्हणून काहीजण त्याच्या अटकेची मागणीही करू लागलेत.


हेही वाचा -Ram Kadam Letter CM Thackeray : शिवाजी पार्कमध्ये लतादीदींचे स्मारक उभारा, राम कदमांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी


काय म्हणते उर्मिला मातोंडकर
परंतु शाहरुख खान च्या त्या क्रियेचे समर्थन करीत उर्मिला मातोंडकर मैदानात उतरली आहे. उर्मिला मातोंडकरने ट्विट करून शाहरुख खानने तिथे नेमके काय केले याचा खुलासा केला. तिने शाहरुख लता दीदींच्या पार्थिवावर थुकला नसून त्याने फुंकर मारली असे तिने सांगितले. “याला थुंकणे नाही, दुआ देत फुंकणे म्हणतात. या सभ्यतेला, संस्कृतीला भारत म्हणतात. पंतप्रधानांचा फोटो लावला आहे, त्यांच्याकडून काहीतरी शिकायला हवे होते. भारत मातेच्या अनमोल मुलीचे गाणे ऐका, ‘ईश्वर अल्लाह तेरे नाम, सबको सन्मति दे भगवान, सारा जग तेरी सन्तान.’ आजचा दिवस तरी सोडायचा होता,” असे उर्मिला मातोंडकरने ट्विट केले आहे.

थूकना नही दुआओं को फुँकना कहते हैं।इस सभ्यता,संस्कृति को #भारत कहते हैं।
प्रधानमंत्री जी की फ़ोटो तो लगा रखी हैं, उनसे कुछ सीखा होता।
भारत माँ कीं अनमोल बेटी का गाना सुनें
“ईश्वर अल्लाह तेरे नाम, सबको सन्मति दे भगवान,
सारा जग तेरी सन्तान”
(आज का दिन तो छोड़ देतें🙏🏻)

थुंकणे का फुंकणे यावर राजकारण
लता मंगेशकर यांच्या पार्थिवाला श्रद्धांजली वाहण्यासाठी शाहरुख खान आणि त्याची मॅनेजर पूजा ददलानी एकत्र स्टेजवर चढले होते. पूजा ददलानी हात जोडून उभी होती आणि शाहरुख खानने प्रथम प्रार्थना केली, त्यानंतर मास्क खाली सरकवून खाली वाकून पार्थिवावर फुंकर मारली. यानंतर शाहरुख खान पूजा ददलानीसोबत हात जोडून पार्थिवाभोवती प्रदक्षिणा करून स्टेजवरून खाली उतरला. आता हे ‘थुंकणे की फुंकणे’ प्रकरण राजकीय वळण घेणार असे दिसतेय.
हेही वाचा -Shah Rukh Khan : शाहरुखने लता दीदींच्या पार्थिवासमोर मागितली दुआ, तर्कवितर्कांना उधाण

ABOUT THE AUTHOR

...view details