दिलीप कुमार यांचे दोन्ही भाऊ कोरोना 'पॉझिटिव्ह', श्वास घेण्यास त्रास होत असल्यानं व्हेंटिलेटरवर - Dilip kumar news
दोन्ही भाऊ दिलीप कुमार यांच्यासोबत न राहता आपल्या आपल्या कुटूंबासह वेगळे राहतात. त्यांना काल रात्री रुग्णालयात दाखल केल्यानंतर सध्या डॉक्टर जलील पारकर यांच्या निरिक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे. दोघांनाही श्वास घ्यायला त्रास होत असल्याने त्यांची कोविड चाचणी करण्यात आली.
मुंबई - बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे दोन्ही भाऊ एहसान खान आणि अस्लम खान यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. एहसान यांचं वय 90 असून अस्लम यांचे वय 88 आहे. या दोघांना अचानक श्वास घ्यायला त्रास होऊ लागल्याने त्याना काल(शनिवार) रात्री तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
हे दोन्ही भाऊ दिलीप कुमार यांच्यासोबत न राहता आपल्या आपल्या कुटूंबासह वेगळे राहतात. त्यांना काल रात्री रुग्णालयात दाखल केल्यानंतर सध्या डॉक्टर जलील पारकर यांच्या निरिक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे. दोघांनाही श्वास घ्यायला त्रास होत असल्याने त्यांची कोविड चाचणी करण्यात आली. ही चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं असल्याचं रुग्णालय प्रशासनाने सांगितलं आहे.