मुंबई- सलमान खान आणि कॅटरिना कैफ यांच्या मुख्य भूमिका असलेला भारत चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. अशात चित्रपटातील नवनवीन गाणी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. चित्रपटातील इतर गाण्यांना मिळालेल्या प्रेक्षकांच्या प्रतिसादानंतर आता 'तुर्पेया' हे गाणं प्रदर्शित करण्यात येणार आहे.
'मेरी मिट्टी, मेरा देश'; सलमानच्या 'भारत'मधील 'तुर्पेया' गाणं आज होणार प्रदर्शित - bharat
सलमान खानने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून हे गाणं आज प्रदर्शित होणार असल्याचं म्हटलं आहे. मेरी मिट्टी, मेरा देश असे कॅप्शन देत त्याने नेव्हीच्या यूनिफॉर्ममधील आपला एक फोटो शेअर केला आहे.
सलमान खानने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून हे गाणं आज प्रदर्शित होणार असल्याचं म्हटलं आहे. मेरी मिट्टी, मेरा देश असे कॅप्शन देत त्याने नेव्हीच्या यूनिफॉर्ममधील आपला एक फोटो शेअर केला आहे. ज्यात त्याने काळ्या रंगाचे गॉगलही घातले आहेत.
या गाण्याला विशाल-शेखर यांनी आवाज दिला आहे. दरम्यान याआधी चित्रपटातील 'स्लो मोशन', 'जिंदा', 'चश्नी' आणि 'अैथे आ'सारखी अनेक गाणी प्रदर्शित करण्यात आली होती. आता या नव्या गाण्याला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. अली अब्बास जफर यांचे दिग्दर्शन असलेला 'भारत' चित्रपट येत्या ५ जूनला प्रदर्शित होणार आहे.