मुंबई- प्रियांकाने भारतीय सैन्य आणि भारत सरकारचे समर्थन केल्यामुळे पाकिस्तानने तिच्यावर आरोप केले आहेत. युनिसेफमध्ये सदिच्छादूत म्हणून कार्यरत असलेल्या देसी गर्लचे सदिच्छादूत हे पद काढून घ्यावे, अशी मागणी पाकिस्तानने केली आहे. ज्यानंतर बॉलिवूडचे अनेक कलाकार प्रियांकाच्या समर्थनार्थ उतरले आहेत.
कंगना पाठोपाठ आयुष्मानचाही प्रियांकाला पाठिंबा, म्हणाला.... - मानवाधिकार मंत्री शिरीन मझारी
एका आर्मी ऑफिसरची मुलगी असल्यानं ती देशाला खूप चांगल्या पद्धतीनं रिप्रेझेंट करु शकत असल्याचं आयुष्मान म्हणाला. प्रियांकाने भारतीय सैन्यदलाच्या कारवाईच्या समर्थनार्थ केलेल्या ट्विटनंतर पाकिस्तानच्या मानवाधिकार मंत्री शिरीन मझारी यांनी प्रियांकाविरोधात आवाज उठवला होता.
कंगनानं प्रियांकाची पाठराखण केल्यानंतर आता आयुष्मान खुराणानेही तिला पाठिंबा दिला आहे. आयुष्मान म्हणाला, मला असं वाटतं, प्रियांका आपल्या देशाला अतिशय उत्तम पद्धतीनं रिप्रेझेंट करते. ती केवळ भारतच नाही तर इतर देशांसाठीही आयकॉन आहे.
एका आर्मी ऑफिसरची मुलगी असल्यानं ती देशाला खूप चांगल्या पद्धतीनं रिप्रेझेंट करु शकत असल्याचं आयुष्मान म्हणाला. प्रियांकाने भारतीय सैन्यदलाच्या कारवाईच्या समर्थनार्थ केलेल्या ट्विटनंतर पाकिस्तानच्या मानवाधिकार मंत्री शिरीन मझारी यांनी प्रियांकाविरोधात आवाज उठवला होता. त्यामुळे तिच्या समर्थनार्थ कलाकार पुढे आले आहेत.