मुंबई - अभिनेत्री तापसी पन्नूच्या आगामी 'गेम ओव्हर' चित्रपटाची काही दिवसांपूर्वीच घोषणा करण्यात आली. 'गेम ओव्हर' हा चित्रपट एका तेलुगू चित्रपटाचा हिंदी रिमेक असणार आहे. आता या चित्रपटाच्या हिंदी ट्रेलरच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.
तापसीच्या 'गेम ओव्हर'चा हिंदी ट्रेलर 'या' दिवशी होणार प्रदर्शित - release date
'गेम ओव्हर' चित्रपट हिंदी, तामिळ आणि तेलुगू, अशा तीन भाषांत प्रदर्शित होणार आहे. अश्विन सारावनन यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.
येत्या ३० मे रोजी चित्रपटाचा हिंदी ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे चित्रपट व्यापार विश्लेषकांनी ट्विट करून सांगितले आहे. हा चित्रपट येत्या १४ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा एक सस्पेन्स थ्रिलर चित्रपट असल्याचे टीझरवरून लक्षात येते.
'गेम ओव्हर' चित्रपट हिंदी, तामिळ आणि तेलुगू, अशा तीन भाषांत प्रदर्शित होणार आहे. अश्विन सारावनन यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. तर अनुराग कश्यप यांची निर्मिती आहे. 'बदला' चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर तापसीच्या या चित्रपटाचीही प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.