महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

अर्जुन रामपालच्या गर्लफ्रेंडनं शेअर केला बाळासोबतचा फोटो, असं दिलं कॅप्शन - बाळ

अर्जुन आणि गॅब्रियेला गेल्या एका वर्षापासून एकमेकांना डेट करत आहेत. अशात काही दिवसांपूर्वीच गॅब्रियेलानं एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. तिनं आता सोशल मीडियावर मुलासोबतचा फोटो शेअर केला आहे.

अर्जुन रामपालच्या गर्लफ्रेंडनं शेअर केला बाळासोबतचा फोटो

By

Published : Jul 27, 2019, 5:09 PM IST

मुंबई- अर्जुन रामपाल आपल्या चित्रपटांपेक्षाही वैयक्तिक आयुष्यामुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. आधी पत्नीसोबतच्या घटस्फोटामुळे तर नंतर गर्लफ्रेंडमुळे. काही दिवसांपासून तो गॅब्रियेला डिमेट्रीयाडीस हिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. तेव्हापासून त्यांच्या नात्याच्या जोरदार चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळतात.

अशात काही दिवसांपूर्वीच गॅब्रियेलानं एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. तिनं आता सोशल मीडियावर मुलासोबतचा फोटो शेअर केला आहे. याला दिलेल्या कॅप्शनमध्ये तिनं म्हटलं, थकलीये मात्र तरीही प्रेमात. मात्र, या फोटोत मुलाचा चेहरा पाहायला मिळत नाहीये.

अर्जुन रामपालच्या गर्लफ्रेंडनं शेअर केला बाळासोबतचा फोटो

अर्जुन आणि गॅब्रियेला गेल्या एका वर्षापासून एकमेकांना डेट करत आहेत. एप्रिल महिन्यात २४ तारखेला अर्जुनने गॅब्रियेलासोबतचा एक फोटो शेअर करून ते त्यांच्या बाळाच्या आगमनासाठी सज्ज असल्याचे सांगितले होते. यानंतर गॅब्रियेलाच्या बेबी शॉवरचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details