मुंबई - अजय देवगण दिग्दर्शित 'रनवे ३४' या चित्रपटाचा टिझर रिलीज करण्यात आला आहे. यात अजय देवगण आणि रकुल प्रीत सिंग विमानाचे पायलट असून काळ्याकुट्ट ढगातून चमकणाऱ्या विजांसह ते विमान चालवताना दिसत आहेत. या चित्रपटात अमिताभ महत्त्वाच्या भूमिकेत असून त्यांचा व्हाईस आपल्याला टिझरमध्ये ऐकायला मिळतो. कितीही वेगाने वर उडलो तरी तितक्याच वेगाने परत खाली यावे लागते, हा गुरुत्वाकर्षणाचा नियम असल्याचे बच्चन सांगताना दिसतात.
'रनवे 34' हा आगामी हिंदी भाषेतील थ्रिलर चित्रपट आहे. अजय देवगणने दिग्दर्शित केलेल्या चित्रपटाची निर्मितीही त्यानेच केली आहे. या चित्रपटात देवगण, अमिताभ बच्चन, रकुल प्रीत सिंग, अंगिरा धर, आकांक्षा सिंग आणि अजय नागर यांच्या भूमिका आहेत.