मुंबई- अक्षय कुमारनं बॉलिवूड कलाकारांच्या एखादा चित्रपट साईन करताना असलेल्या दृष्टीकोनाबद्दल खंत व्यक्त केली आहे. सध्याच्या काळात कोणत्याही अभिनेत्याला अशा चित्रपटात काम करण्याची इच्छा नसते, ज्यात दोन किंवा त्याहून अधिक नायक आहेत.
बॉलिवूडमधील 'या' विचारसरणीबद्दल अक्षयनं व्यक्त केली खंत - हॉलिवूड
सध्या अभिनेते खूप कमी वेळा एकत्र काम करताना पाहायला मिळतात. हॉलिवूडमध्ये असं कधीच होत नाही. हे फक्त आपल्याकडेच घडतं आणि हे खरंच खूप वाईट आहे, असं अक्षय म्हणाला.
या कलाकारांना अशा चित्रपटामध्ये काम करण्याची इच्छा का होत नाही, हे जाणून घेण्याचा प्रयत्न मी करत असल्याचं अक्षयनं म्हटलं. पूर्वी असं नसायचं, एका सिनेमात तीन-तीन अभिनेतेही मुख्य भूमिकेत काम करायचे, असं अक्षय मिशन मंगलच्या प्रमोशनदरम्यान बोलताना म्हणाला.
सध्या अभिनेते खूप कमी वेळा एकत्र काम करताना पाहायला मिळतात. अशात त्यांनी एकत्र काम केलं, तरी ते दिग्दर्शकाच्या अनेक विनंतीनंतर होकार देतात. हॉलिवूडमध्ये असं कधीच होत नाही. हे फक्त आपल्याकडेच घडतं आणि हे खरंच खूप वाईट आहे, असं अक्षय म्हणाला.