महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'दे दे प्यार दे' चित्रपटाचं दुसरं पोस्टर प्रदर्शित, १७ मे ला होणार रिलीज - rakul preet singh

अकिव अली यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. मे महिन्यात १७ तारखेला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'दे दे प्यार दे' चित्रपटाचं दुसरं पोस्टर प्रदर्शित

By

Published : May 3, 2019, 11:05 AM IST

मुंबई- अजय देवगण, तब्बू आणि रकुल प्रीत अशी तगडी स्टारकास्ट लवकरच सिनेमागृह गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे. हे कलाकार 'दे दे प्यार दे' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी आता या चित्रपटाचं दुसरं नवं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे.


या पोस्टरमध्ये अजय, तब्बू आणि रकुल एका बाईकवर बसलेले दिसत आहेत. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हे पोस्टर शेअर केलं आहे. अकिव अली यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. मे महिन्यात १७ तारखेला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


भूषण कुमार, किशन कुमार आणि लव रंजन यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटात अजय आशिष नावाच्या ५० वर्षांच्या व्यक्तीचं पात्र साकारत आहे. तर रकुल आयशा नावाचं २६ वर्षाच्या तरूणीचं पात्र साकारत आहे. जी आशिषची गर्लफ्रेंड आहे. तर तब्बू अजयच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details