अजय देवगणचा ‘भुज द प्राइज ऑफ इंडिया’ हा चित्रपट रिलीज झाला आहे. हा चित्रपट 13 ऑगस्ट 5 वाजून 35 मिनीटांनी रोजी डिस्ने-हॉटस्टारवर प्रदर्शित होईल असे ट्विट अभिनेत्री काजोलने केले होते. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट रिलीज करण्यात आला आहे. देशभक्तीच्या भावनेने भरलेला अजय देवगणचा ‘भुज द प्राइज ऑफ इंडिया’ हा चित्रपट सत्य कथेवर आधारित आहे. या चित्रपटामध्ये सैनिक आणि गावकऱ्यांनी दाखवलेले असामान्य साहस आणि शत्रूवर केलेला प्रहार यात दाखवण्यात आलाय.
या चित्रपटात विजय कर्णिकच्या भूमिकेत अजय देवगण दिसला आहे. तर नोरा फतेहीही या चित्रपटात एक वेगळी भूमिका साकारताना दिसत आहे. गुजराती वेशभूषेत सोनाक्षी सिन्हा आणि संजय दत्तचा लूकही प्रभावशाली वाटत आहे. शरद केळकरही एका साहसी सैनिकाचे पात्र साकारत आहे.
‘भुज द प्राइज ऑफ इंडिया’ हा चित्रपट 13 ऑगस्ट 5 वाजून 35 मिनीटांनी रोजी डिस्ने-हॉटस्टारवर प्रदर्शित होईल असे ट्विट अभिनेत्री काजोलने केले होते.