महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

‘तडप'मधील 'तुमसे भी ज्यादा' गाण्यात गुलाबी रोमान्स आणि इंटेन्स ॲक्शनचा मिलाफ! - अभिनेता सुनील शेट्टीचा सुपुत्र अहान शेट्टी

'तडप'चे पहिले गाणे 'तुमसे भी ज्यादा' धनत्रयोदशीला रिलीज झाले असून अहानने त्याच्या सोशल मीडियावर ही बातमी शेअर केली आहे. त्याने गाण्याची एक छोटी क्लिप पोस्ट केली आहे. या 'तडप'चे पहिले गाणे 'तुमसे भी ज्यादा' धनत्रयोदशीला रिलीज झाले असून अहानने त्याच्या सोशल मीडियावर ही बातमी शेअर केली आहे. त्याने गाण्याची एक छोटी क्लिप पोस्ट केली आहे.

‘तडप' मधील गाणे
‘तडप' मधील गाणे

By

Published : Nov 2, 2021, 8:40 PM IST

अभिनेता सुनील शेट्टीचा सुपुत्र आणि अभिनेत्री अथिया शेट्टीचा भाऊ अहान शेट्टी बॉलिवूड चित्रपट ‘तडप’मधून अभिनय पदार्पण करतोय. अहान शेट्टी अभिनित 'तडप'चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून त्याला लोकांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. अहान त्याच्या पहिल्या चित्रपटात ‘स्टुडंट ऑफ द ईयर’ मधून पदार्पण केलेली अभिनेत्री तारा सुतारियासोबत दिसणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमधून संकेत मिळतात की हा चित्रपट इंटेन्स ॲक्शन आणि गुलाबी रोमान्सने भरलेला आहे. आता या चित्रपटाचे पहिले गाणे रिलीज झाले आहे ज्याला रसिकांची खूप पसंती मिळत आहे.

'तडप'चे पहिले गाणे 'तुमसे भी ज्यादा' धनत्रयोदशीला रिलीज झाले असून अहानने त्याच्या सोशल मीडियावर ही बातमी शेअर केली आहे. त्याने गाण्याची एक छोटी क्लिप पोस्ट केली असून 'तडप'चे पहिले गाणे 'तुमसे भी ज्यादा' धनत्रयोदशीला रिलीज झाले असून अहानने त्याच्या सोशल मीडियावर ही बातमी शेअर केली आहे. त्याने गाण्याची एक छोटी क्लिप पोस्ट केली आहे.

साजिद नाडियाडवाला निर्मित, फॉक्स स्टार स्टूडियोजद्वारे प्रस्तुत आणि सह-निर्मित, रजत अरोरा लिखित आणि मिलन लुथरिया दिग्दर्शित, नाडियाडवाला ग्रॅंडसन एंटरटेनमेंट प्रॉडक्शन 'तडप' ३ डिसेंबर २०२१ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा - HBD SRK : मन्नत बंगल्याबाहेर फॅन्सची गर्दी, शाहरुख मात्र एकांतवासात

ABOUT THE AUTHOR

...view details