महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

"वयहीन आश्चर्य" : अनिल कपूरचा ६४ वा वाढदिवस 'जुग जुग जीयो'च्या सेटवर साजरा - अनिल कपूरना वाढदिवसाच्या शुभेच्छा

अभिनेता अनिल कपूरच्या ६४ व्या वाढदिवशी सहकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेता अनुपम खेरने 'नायक' अनिल कपूरला दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

अनिल कपूर
Anil Kapoor

By

Published : Dec 24, 2020, 2:26 PM IST

मुंबई- अभिनेता अनिल कपूर गुरुवारी आपला ६४ वा वाढदिवस चंडिगडमध्ये साजरा करीत आहे. 'जुग जुग जीयो'च्या शुटिंगसाठी सध्या तो चंदिगडला आला आहे. पत्नी सुनिता कपूरसह ‘जुग जुग जीयो’ चित्रपटाच्या कलाकारांसमवेत वाढदिवस साजरा केला आहे.

अभिनेता वरुण धवन आणि कियारा अडवाणी जोडी राज मेहता याच्या दिग्दर्शनाखाली शूटिंग करत आहेत. त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ पोस्ट करुन अनिल कपूर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

या व्हिडिओमध्ये सदैव तरूण आणि तंदुरुस्त अभिनेता अनिल कपूर पत्नी सुनीता कपूरसोबत दिसत असून वरुण धवन, कियारा अडवाणी, यूट्यूबर प्राजक्ता कोळी आणि दिग्दर्शक राज मेहता यांच्यासह चित्रपटातील कलाकार वाढदिवसाच्या केक कापताना आनंदी दिसत आहे.

अनिल कपूरचा ६४ वा वाढदिवस

'जुग जुग जीयो' चे दिग्दर्शक राज मेहता यांनीही अनिल कपूरच्या वाढदिवशी खास पोस्ट शेअर करुन इंस्टाग्रामवर शुभेच्छा दिल्या आहेत. यात अनिल कपूरचा एक फोटो दिसत असून टेबलवर केक आहे व मागे सजावट केल्याचे दिसत आहे.

अनिल कपूर दरवर्षी कसे तरुण होत असतात याविषयी गंमत करुन, मेहताने त्यांना "२५ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा" असे लिहिले असून पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्याला "वयहीन आश्चर्य" म्हटले आहे.

अनिल कपूरचा ६४ वा वाढदिवस

अभिनेता अनुपम खेरने 'नायक' अभिनेत्याच्या दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि कपूर नेहमीच प्रेरणादायी कसे रहातात याचे कौतुक केले आहे.

बॉलिवूडमधील फिटनेस जपणाऱ्या ज्येष्ठ कलाकारांपैकी अनिल कपूर एक आहेत. सोशल मीडियावर आपले वर्कआउट फोटो आणि व्हिडिओ शेअर करून तरुण पिढीसाठी फिटनेसचे महत्त्व ते नेहमी समजावून सांगत असतात.

हेही वाचा - मेक्सिकन बेटावरील बिकिनीतील फोटोमुळे कंगना ट्रोल; नेटकऱ्यांना दिले प्रत्युत्तर

युवकांना सक्रिय आणि तंदुरुस्त राहण्यासाठी प्रेरित केल्याबद्दल भारताचे क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनीही अनेक वेळा त्यांचे कौतुक केले आहे.

हेही वाचा - आग्र्यात तिसऱ्या दिवशीही अक्षय, सारा अलीच्या 'अतरंगी रे'चे शुटिंग सुरूच

ABOUT THE AUTHOR

...view details