मुंबई- महात्मा गांधी यांचा खून करणारा नथूराम गोडसे हा पहिला दहशतवादी असल्याचे अभिनेता कमल हसन यांनी म्हटले होते. कमल हसन यांनी तामिळनाडूच्या अरावाकुरिची विधानसभा क्षेत्रात नथूराम गोडसेबद्दल वक्तव्य केले होते. यानंतर त्यांच्यावर अनेक स्तरांतून टीका होत आहे. आता विवेक ओबेरॉयनेही हसन यांना टोला लगावला आहे.
जसा कलेला धर्म नसतो, तसाच दहशतवादालाही धर्म नसतो; विवेकचा कमल हसनला टोला - muslim
कमल हसन यांनी तामिळनाडूच्या अरावाकुरिची विधानसभा क्षेत्रात नथूराम गोडसेबद्दल वक्तव्य केले होते. यानंतर त्यांच्यावर अनेक स्तरांतून टीका होत आहे. विवेक ओबेरॉयनेही हसन यांना टोला लगावला आहे.
कमल सर, ज्याप्रमाणे कलेला कोणताही धर्म नसतो अगदी त्याप्रमाणेच दहशतवादाचाही कोणता धर्म नसतो. तुम्ही गोडसेला दहशतवादी म्हणू शकता. मात्र, त्यापुढे ‘हिंदू’ हा शब्द तुम्ही का वापरला? कारण तुम्ही त्यावेळी मुस्लिमबहुल भागात मतं शोधत होतात ? असे विवेकने ट्विट करत म्हटले आहे.
यासोबतच सर एका लहान कलाकाराची एका ग्रेट कलाकाराला विनंती आहे, की देशात फूट पाडण्याचे काम करू नका, आपण सर्व एक आहोत. असेही विवेकने पुढे म्हटले आहे. दरम्यान अभिनेता विवेक ओबेरॉय लवकरच पीएम मोदी बायोपिकमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.