मुंबई- श्रद्धा कपूर आणि दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास यांच्या मुख्य भूमिका असलेला 'साहो' चित्रपट सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. जबरदस्त अॅक्शन, स्टंट आणि बिग बजेट असलेल्या या सिनेमाचे आतापर्यंत प्रदर्शित झालेले टीझर प्रेक्षकांच्या चांगलेच पसंतीस उतरले. अशात आता चित्रपटातील नव्या गाण्याचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे.
प्रभास-श्रद्धाची लव केमिस्ट्री, 'साहो'च्या 'इन्नी सोनी' गाण्याचा टीझर प्रदर्शित - निल नितीन मुकेश
'इन्नी सोनी' असं शीर्षक असलेल्या या गाण्याचा ३६ सेकंदाचा व्हिडिओ प्रदर्शित होताच इंटरनेटवर हीट झाला. या गाण्याला पंजाबी गायक गुरू रंधवा आणि तुलसी कुमार यांनी आवाज दिला आहे.
'इन्नी सोनी' असं शीर्षक असलेल्या या गाण्याचा ३६ सेकंदाचा व्हिडिओ प्रदर्शित होताच इंटरनेटवर हीट झाला. या गाण्याला पंजाबी गायक गुरू रंधवा आणि तुलसी कुमार यांनी आवाज दिला आहे. गाण्याचा टीझर हिंदी, तेलुगू, तमिळ आणि मल्ल्याळम अशा चार भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. तर संपूर्ण गाणं २ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
याआधी चित्रपटातील 'सायको सय्या' गाणं प्रदर्शित झालं होतं. 'इन्नी सोनी' हे एक रोमँटीक साँग आहे, तर याआधी प्रदर्शित झालेलं गाणं डान्स नंबर होतं. या चित्रपटाचं चित्रीकरण ऑस्ट्रेलियासोबतच हैदराबाद आणि मुंबईसारख्या शहरांमध्ये झालं आहे. सुजित रेड्डी यांचं दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाचं बजेट ३०० कोटी इतकं आहे. चित्रपटात निल नितीन मुकेश, अरूण विजय, जॅकी श्रॉफ, मंदिरा हेदी, महेश मांजरेकर आणि चंकी पांडे यांच्याही महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत. येत्या ३० ऑगस्टला हा सिनेमा हिंदी, मल्ल्याळम, तेलुगू आणि तमिळ अशा चार भाषेत प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.