मुंबई- जॉन अब्राहमची मुख्य भूमिका असलेला बाटला हाऊस चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. २००८ मध्ये बाटला हाऊस येथे दिल्ली पोलीस आणि दहशतवाद्यांच्यात झालेल्या चकमकीवर हा चित्रपट आधारित असणार आहे. दरम्यान चित्रपटाच्या रहस्यमय ट्रेलरनं प्रेक्षकांची उत्कंठा वाढलेली असतानाच चित्रपटातील पहिल्या गाण्याची झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
Batla House First Song: नोरा फतेहीचा 'ओ साकी साकी' गाण्यावर खास डान्स - first song
ओ साकी साकी गाण्यात आपल्या डॅशिंग अंदाजामुळे ओळखल्या जाणाऱ्या नोरा फतेहीचा खास डान्स पाहायला मिळत आहे. हे गाणं संजय दत्तच्या मुसाफिर चित्रपटातील साकी साकी गाण्याचं रिक्रिएट वर्जन आहे.
ओ साकी साकी असं शीर्षक असलेल्या या गाण्याचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. यात आपल्या डॅशिंग अंदाजामुळे ओळखल्या जाणाऱ्या नोरा फतेहीचा खास डान्स पाहायला मिळत आहे. हे गाणं संजय दत्तच्या मुसाफिर चित्रपटातील साकी साकी गाण्याचं रिक्रिएट वर्जन आहे. हे संपूर्ण गाणं १५ जुलैला प्रदर्शित होणार आहे.
या नव्या वर्जनला नेहा कक्कडने आवाज दिला आहे. एका मुलाखतीदरम्यान बोलताना नोरा फतेही आपल्यासाठी लकी असल्याचे जॉनने म्हटले होते. नोराने याधीही जॉनच्या 'सत्यमेव जयते' चित्रपटातील 'दिलबर-दिलबर' गाण्यावर डान्स केला आहे. दरम्यान 'बाटला हाऊस' चित्रपट येत्या १५ ऑगस्टला म्हणजेच स्वातंत्र्यदिनी प्रदर्शित होणार आहे.