महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 23, 2021, 8:25 PM IST

ETV Bharat / sitara

'तारक मेहता'ची 'दयाबेन' आमिर खान, ऐश्वर्यासोबतही झळकली आहे मोठ्या पडद्यावर

'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेमधील 'दयाबेन' अर्थात अभिनेत्री दिशा वकानीचे मालिकेमध्ये पुनरागमन व्हावे असी मालिकेतील कलाकारांसह प्रेक्षकांची इच्छा आहे. दिशा वकानी आज जरी छोट्या पडद्यावर राज्य करीत असली तरी तिने मोठा पडदाही गाजवलाय. बॉलिवूडच्या ए ग्रेड कलाकारांसोबतही तिने काम केलंय.

tarak-mehtas-dayaben-acting-with-aamir-khan-
'तारक मेहता'ची 'दयाबेन'

मुंबई - 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेमधील 'दयाबेन' अर्थात अभिनेत्री दिशा वकानी गेली चार वर्षापासून टीव्ही शोपासून दूर आहे. २०१७ मध्ये तिने मालिकेतून बाळंतपणासाठी रजा घेतली. मात्र गेल्या चार वर्षापासून ती शोकडे फिरकलेलीच नाही. आतापर्यंत मालिकेमध्ये अनेक पात्रंची रिप्लेसमेंट करण्यात आली. अगदी दयाबेनचा मुलगा टप्पूही बदलला गेला. मात्र चार वर्षे शोच्या बाहेर असूनही दिशा वकानीला बदलण्याचे धाडस निर्मात्यांनी अद्याप केलेले नाही.

'दयाबेन' ऐश्वर्यासोबतही झळकली आहे मोठ्या पडद्यावर

चार्टड अकाउंटसोबत दिशाचा विवाह

मयूर पंड्या या चार्टड अकाउंटसोबत दिशा वकानीने २४ नोव्हेंबर २०१५ मध्ये विवाह केला होता. त्यानंतर दोनच वर्षात २७ नोव्हेंबर २०१७ रोजी तिला कन्यारत्न प्राप्त झाले. तेव्हापासून ती छोट्या किंवा मोठ्या पडद्यावर दिसलेली नाही.

मोठ्या पडद्यावरही झळकली आहे दिशा वकानी

दिशा वकानी ही गुजराती रंगभूमीवर चमकलेली अभिनेत्री कमाल पटेल व्हर्सेस धमाल पडेल, आणि लाली लीला या नाटकातून झळकली होती. तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका सब टीव्हीवर२००८ मध्ये सुरू झाली. त्यापूर्वीच तिने कमसिन - द अनटच्ड या हिंदी सिनेमातून बॉलिवूड पदार्पण केले होते. या चित्रपटात तिने एक बोल्ड सीन देखील केला होता.

त्यानंतर तिने तीन गुजराती चित्रपटही केले. त्यानंतर तिने २००२ मध्ये संजय लीला भन्साळी यांच्या देवदास या चित्रपटात सखी ही व्यक्तीरेखा साकारली.

दिशा वकानीने आमिर खान याच्या 'मंगल पांडे' या गाजलेल्या चित्रपटात यास्मीन ही व्यक्तीरेखा साकारली होती. त्यानंतर २००६ मध्ये तिने 'जोधा अकबर' या चित्रपटात ऐश्वर्या रायसोबत दासीचे काम केले होते. 'सी कंपनी', 'लव्ह स्टोरी २०५०' अशा काही चित्रपटातूनही तिने भूमिका साकारल्या आहेत.

हेही वाचा - 'तारक मेहता...' : 'दयाबेन' दिशा वकानीची जागा दिव्यांका त्रिपाठी घेणार?

ABOUT THE AUTHOR

...view details