मुंबई- अजय देवगण आणि सैफ अली खान यांच्या भूमिका असलेला 'तानाजी द अनसंग वॉरियर' चित्रपट या वर्षीचा बहुप्रतीक्षित चित्रपट आहे. प्रेक्षक या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, अशात चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर पडले आहे.
'तानाजी'च्या रिलीज डेटमध्ये बदल, आता 'या' दिवशी होणार प्रदर्शित - ajay devgan
अजय आणि सैफच्या चाहत्यांसाठी ही वाईट बातमी ठरणार आहे. हा चित्रपट २०१९ मध्येच प्रदर्शित केला जाणार होता. मात्र, आता प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आहे
अजय आणि सैफच्या चाहत्यांसाठी ही वाईट बातमी ठरणार आहे. हा चित्रपट २०१९ मध्येच प्रदर्शित केला जाणार होता. मात्र, आता प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली असून चित्रपट २०२० मध्ये १० जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. अजय देवगणने स्वतः आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबद्दलची माहिती दिली आहे.
२०२० या नवीन वर्षाची सुरूवात माझ्यासोबत, असे कॅप्शन देत अजयने नवीन रिलीज डेट जाहीर केली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अजय आणि सैफची जोडी तब्बल १२ वर्षांनंतर स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. याआधी 'ओमकारा' चित्रपटात ही जोडी शेवटची एकत्र झळकली होती. 'तानाजी' चित्रपटाचं दिग्दर्शन ओम राऊत करत आहेत तर भूषण कुमार आणि अजय देवगण यांची निर्मिती असणार आहे.