मुंबई - आतापर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रात नाव कमवणाऱ्या अनेक व्यक्तींवर आधारित चित्रपट बॉलिवूडमध्ये आले आहेत. यात महेंदसिंह धोनी, सचिन तेंडुलकर आणि आता कपिल देव यांचाही समावेश झाला आहे. या पाठोपाठ आता महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज हिच्या बायोपिकचीही सध्या चर्चा आहे.
मिताली राजच्या बायोपिकमध्ये काम करण्याची 'या' अभिनेत्रीनं व्यक्त केली इच्छा - womens cricket team
महेंदसिंह धोनी, सचिन तेंडुलकर आणि आता कपिल देव यांच्या बायोपिक पाठोपाठ महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज हिच्या बायोपिकचीही सध्या चर्चा आहे.
नुकतंच अभिनेत्री तापसी पन्नूने मुंबईतील एका रेडिओ स्टेशनकडून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी तिने मीडियासोबत संवाद साधला. यावेळी तिला या बायोपिकबद्दल विचारले असता, तुमच्यापैकी कोणाची मिताली राजवर बायोपिक बनवणाऱ्या निर्मात्यासोबत ओळख असेल, तर माझं नाव त्यांना नक्की सुचवा. कारण मला तिच्या बायोपिकमध्ये काम करण्याची खूप इच्छा असल्याचे तापसीनं म्हटलं आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वीच तापसी 'बदला' आणि 'गेम ओव्हर'सारख्या चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. तिनं नुकतंच 'सांड की आँख' चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण केलं असून यात ती भूमी पेडणेकरसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. मात्र, आता मिताली राजच्या बायोपिकमध्ये तापसीची वर्णी लागणार का? याकडेच तिच्या चाहत्यांचं लक्ष लागलेलं आहे.