मुंबई- गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडला एकापाठोपाठ एक हिट सिनेमे देणारी अभिनेत्री तापसी पन्नू कंगना रनौतला आपली प्रेरणा मानते. होय, नुकतंच मिशन मंगल चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या या अभिनेत्रीनं एका मॅगझीनला दिलेल्या मुलाखतीत याबद्दल खुलासा केला आहे.
कंगनाची ही गोष्ट तापसीला करते प्रेरित, पाहा व्हिडिओ - प्रियांका चोप्रा
याआधी कंगनाची बहिण रंगोलीनं तापसीला 'सस्ती कॉपी' म्हटल्यामुळे हा वाद चांगलाच गाजला होता. अशातही तापसीनं कंगना आपली प्रेरणा असल्याचं म्हटल्यानं अनेकांसाठी हे काहीसं आश्चर्यकारकच आहे.
कोणाकडून तुला प्रेरणा मिळाली, असा सवाल केला असता तापसीनं कंगनाचं नाव घेतलं. कंगना कोणतीही गोष्ट न घाबरता करते, तिच्याकडून मला या गोष्टीची प्रेरणा मिळाल्याचं तापसी म्हणाली. याशिवाय तिनं प्रियांका चोप्रा आणि अनुष्का शर्मा यांचीही नावं घेतली.
हा व्हिडिओ तापसीनं आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला आहे. दरम्यान याआधी कंगनाची बहिण रंगोलीनं तापसीला सस्ती कॉपी म्हटल्यामुळे हा वाद चांगलाच गाजला होता. अशातही तापसीनं कंगना आपली प्रेरणा असल्याचं म्हटल्यानं अनेकांसाठी हे काहीसं आश्चर्यकारकच आहे.