महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'आर्या २'मधून पुन्हा प्रेक्षकांना भेटायला येतेय सुष्मिता सेन! - आर्या सीझन 2

दुसऱ्या सीझनमध्ये सुष्मिता सेन(Sushmita Sen)च्या क्रूर लूकच्या रोमांचक टीझरने इंटरनेटवर खळबळ उडवली आहे. चाहत्यांना आगामी सीझनसाठी त्यांचा उत्साह रोखता येत नाहीये आणि त्याचवेळी मोशन पोस्टरच्या निमित्ताने सुष्मिता सेनने आर्या २(Aary season 2)च्या शूटमधील तिची संस्मरणीय आठवणदेखील शेअर केलीय. प्रत्येक शूट हा कलाकारासाठी एक संस्मरणीय अनुभव असतो, तरीही काही क्षण असे असतात जे आयुष्यभराठी संस्मरणीय बनतात.

आर्या सीझन 2
आर्या सीझन 2

By

Published : Nov 26, 2021, 10:00 AM IST

डिजिटल प्लॅटफॉर्मवर विस्मृतीत गेलेल्या अनेक कलाकारांना पुन्हा कॅमेऱ्यासमोर आणले, ज्यात मिस युनिव्हर्स सुश्मिता सेनचादेखील समावेश आहे. सुष्मिता सेनने 'आर्या'द्वारे तिचे डिजिटल क्षेत्रात पदार्पण केले तसेच अभिनय-पुनरागमनसुद्धा केले आहे. दिग्दर्शक राम माधवानी यांनी या सीरीजद्वारे वेब विश्वात प्रवेश केला. डिस्ने+हॉटस्टारची 'आर्या' २०२०मधील सर्वात लोकप्रिय वेब सीरीज बनली. त्याला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे ‘आर्या’चा दुसरा सिझन येऊ घातलाय.

आर्या सीझन 2

या शोच्या दुसऱ्या सीझनमध्ये सुष्मिता सेन(Sushmita Sen)च्या क्रूर लूकच्या रोमांचक टीझरने इंटरनेटवर खळबळ उडवली आहे. चाहत्यांना आगामी सीझनसाठी त्यांचा उत्साह रोखता येत नाहीये आणि त्याचवेळी मोशन पोस्टरच्या निमित्ताने सुष्मिता सेनने आर्या २(Aary season 2)च्या शूटमधील तिची संस्मरणीय आठवणदेखील शेअर केलीय. प्रत्येक शूट हा कलाकारासाठी एक संस्मरणीय अनुभव असतो, तरीही काही क्षण असे असतात जे आयुष्यभराठी संस्मरणीय बनतात.

‘आर्या २’मधील अशाच एका घटनेबद्दल बोलताना सुष्मिता सेन म्हणाली, की जसे जसे आपण पुढे जातो आहोत, प्रेक्षकांना मेकिंग आणि प्रोसेसबद्दल सांगण्याच्या या प्रवासात अशा अनेक घटना आहेत. मात्र, हा असा एक खास सीन आहे, जो आम्ही जयपूरमधील हेलिपॅडवर शूट केला आहे. हे एक महत्त्वाचे दृश्य होते, २४ मिनिटांचा एक मोठा टेक होता जो एकाच वेळी आणि अनेक व्हेरिएशन्ससह शूट केला गेला होता.

या सीनबद्दल अधिक माहिती देताना सुष्मिताने सांगितले, की सीझन २साठी हा एक अतिशय महत्त्वाचा सिक्वेन्स होता. तुम्हाला माहीत असेल, की राजस्थानमध्ये ऑफ सीझन पाऊस पडत नाही, मात्र २४ मिनिटांच्या या सीनमध्ये शेवटी प्रचंड गडगडाटासह पाऊस पडला, फक्त आमच्यासाठी! आम्हाला एक अप्रतिम बॅकड्रॉप स्कोअर मिळाला आणि एन्व्हायर्नमेंटल साउंडची आवड असलेल्या आमचे दिग्दर्शक म्हणाले, की हे यापेक्षा चांगले असूच शकत नाही. त्यामुळे हा सीन आपल्या सर्वांसाठी हाय पॉइंट आहे आणि तो आमच्यासाठी खूप संस्मरणीय आणि खास दिवस ठरला.

सुष्मिता सेन व्यतिरिक्त, या मालिकेत चंद्रचूर सिंग, नमित दास आणि सिकंदर खेर यांच्या प्रमुख भूमिका आहेत आणि दुसऱ्या आवृत्तीत आणखी नवीन कलाकार पाहायला मिळणार आहेत. 'आर्या २’ लवकरच डिझ्नी+हॉटस्टारवर स्ट्रीमिंगसाठी सज्ज होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details