महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

सुशांतच्या शेजाऱ्यांचा खुलासा, १३ जूनच्या रात्री बंद होती खोलीतली लाईट

सुशांतसिंह मृत्यूप्रकरणाची चौकशी सीबीआय अधिकाऱ्यांकडून वेगाने सुरू आहे. आज टीमने सुशांतच्या घरी पोहोचून चौकशी सुरू केली आहे. सर्व शक्यता लक्षात घेऊन अनेक दृष्कानातून या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे अधिकाऱ्ंयनी सांगितले.

Sushant's neighbors revealed
सुशांतच्या शेजाऱ्यांचा खुलासा

By

Published : Aug 22, 2020, 9:04 PM IST

मुंबई : सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर सुशांत प्रकरणातील तपास प्रक्रिया वेगवान झाली आहे. शनिवारी सीबीआयची टीम सुशांतसिंगच्या मुंबईतील फ्लॅटवर पोहोचली. फॉरेन्सिक टीमदेखील सीबीआय टीमसह एकत्र आली असून अभिनेता यांचे मित्र सिद्धार्थ पिठानी आणि कुक नीरज यांना एकत्र आणले आहे. नीरज आणि सिद्धार्थ पिठानी यांना एकत्र आणण्याचे कारण म्हणजे गुन्हेगारीचे दृश्य पुन्हा तयार करणे आहे.

अभिनेता सुशांतच्या शेजाऱ्याचा मोठा खुलासा -

अभिनेता सुशांत सिंगच्या शेजाऱ्याने मोठा खुलासा केला आहे. शेजाऱ्याने सांगितले की 13 जून रोजी रात्री 10.30 ते 10.45 च्या दरम्यान सुशांतच्या घराचा लाईट बंद होता. ते म्हणाले की फक्त किचन लाईट चालू होती. त्या शेजाऱ्याने सांगितले की, त्या रात्री सुशांतसिंह यांच्या निवासस्थानी कोणतीही पार्टी आयोजित केली नव्हती. त्याने सांगितले की सुशांतच्या घराचा प्रकाश इतक्या लवकर कधी बंद होत नसे.

सुशांतसिंह राजपूत यांच्या फ्लॅटवरही मुंबई पोलिसांची टीम पोहोचली आहे. यापूर्वी केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) ची टीम सुशांतचा कुक नीरजला सांताक्रूझच्या गेस्ट हाऊसमध्ये चौकशीसाठी घेऊन आली होती. या गेस्टहाऊसमध्ये सीबीआय टीमचा मुक्काम आहे. त्याशिवाय सुशांतसिंग राजपूत यांच्या अ‍ॅटॉप्सीच्या फाइल्सची चौकशी करण्यासाठी एम्सने शुक्रवारी फॉरेन्सिक तज्ञांचे पाच सदस्यीय वैद्यकीय मंडळ स्थापन केले आहे. सीबीआयने शुक्रवारी या संदर्भात एम्सकडे मत मागितले होते.

सुशांत प्रकरणाची चौकशी करणारी सीबीआय टीम सुशांतसिंग राजपूत यांच्या कुक नीरजची चौकशी करेल, तर फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या टीमचे अध्यक्ष एम्सचे फॉरेन्सिक विभाग प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता असतील. ते म्हणाले, "आम्ही खूनाची शक्यता विचारात घेऊ, सर्व शक्यतांचा वेगवेगळ्या दृष्टीकोनातून सखोल चौकशी केली जाईल."

''सुशांतच्या शरीरावर झालेल्या जखमेच्या खुणा पाहून त्यांचा पुरावा जुळवला जाईल'', असे त्यांनी सांगितले. गुप्ता म्हणाले, ''संरक्षित व्हिसेराची चौकशी केली जाईल. राजपूत यांना नैराश्यातून सोडण्यासाठी देण्यात येणार्‍या औषधांचे विश्लेषण एम्स प्रयोगशाळेत केले जाईल.''

ABOUT THE AUTHOR

...view details