महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

सुशांतच्या मृत्यूनंतर कंपनीच्या आयपी अॅड्रेसमध्ये दोनदा बदल - सुशांत आणि रिया चक्रवर्ती

सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात झपाट्याने बदल होत आहेत. सुशांतच्या मृत्यूनंतर त्याच्या कंपनीच्या आयपी अॅड्रेस आणि डोमेन नेम दोनदा बदलण्यात आल्याचे गोष्ट समोर येत आहे.

Sushant and Riya Chakraborty
सुशांत आणि रिया चक्रवर्ती

By

Published : Aug 10, 2020, 2:41 PM IST

मुंबई: सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाला दिवसेंदिवस कलाटणी मिळत आहे. सुशांत आणि रिया चक्रवर्ती हे एका कंपनीचे संचालक होते. सुशांतच्या मृत्यूनंतर या कंपनीचा आयपी अॅड्रेस आणि डोमेन नेम दोनदा बदलण्यात आल्याचे गोष्ट समोर येत आहे.

सुशांतच्या कंपनीचा आयपी अॅड्रेस आणि डोमेन नेम पहिल्यांदा २३ जून रोजी बदलण्यात आले होते, त्यानंतर ७ ऑगस्ट रोजी यात पुन्हा दुसऱ्यांदा बदल करण्यात आला होता.

हेही वाचा - सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण : रिया चक्रवर्ती चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल

रिया आणि भाऊ शोविक चक्रवर्ती यांची सध्या अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) चौकशी सुरू केली आहे. शुक्रवारी तासनतास चौकशी करून त्यांना आज पुन्हा समन्स बजावण्यात आले. शनिवारी आपल्या बहिणीसमवेत पहिल्यांदा ऑफिसला भेट देणाऱ्या शौविकला विचारपूस करण्याचा हा तिसरा दिवस आहे. रविवारीसुद्धा त्याला ऑफिसमध्ये स्पॉट केले होते.

दिवंगत अभिनेत्याचे वडील के.के. सिंह यांनी रिया आणि इतरांविरूद्ध पाटणामध्ये एफआयआर दाखल केल्यानंतर एफआयआरमधील आरोपींच्याविरुद्ध ईडीने मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर राज्य सरकारने केंद्राकडे या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची शिफारस केल्यानंतर सीबीआयने बिहार पोलिसांकडून हा खटला स्वीकारला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details