मुंबई -सुशांतसिंह राजपूतचे वडील के.के. सिंह यांनी रिया चक्रवर्तीच्या विरोधात प्रतिज्ञापत्र दाखल करून सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सुशांत आत्महत्या प्रकरणाची चौकशी पाटण्यात न होता मुंबईत व्हावी, अशी मागणी करणारी याचिका रियाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. 'एफआयआरचा तपास आधीच सीबीआयकडे वर्ग करण्यात आला असल्याने, मुंबईतील चौकशीचे हस्तांतरण करण्याची मागणी करणारी रियाची याचिका फेटळण्याची विनंती के. के. सिंह यांनी न्यायालयाला केली. या प्रकरणाची पुढील सुनावणी 11 ऑगस्ट रोजी होणार आहे.
रियाचे गुन्हेगारी कृत्य सिद्ध करण्यासाठी आमच्याकडे पुरेसे पुरावे आहेत, असे सुशांत राजपूतच्या वडिलांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले. सर्वोच्च न्यायालय आता रिया चक्रवर्तीच्या याचिकेवर 11 ऑगस्टला सुनावणी करणार आहे.