महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

सुशांतसिंग मृत्यूप्रकरण : कंगनाला मुंबईत प्रत्यक्ष हजर राहण्याचा पोलिसांचा सल्ला? - सुशांतसिंग राजपूत यांच्या मृत्यूप्रकरणी जवाब

सुशांतसिंग राजपूत यांच्या मृत्यूप्रकरणी जवाब नोंदवण्यासाठी मुंबई पोलिसांना कंगना रनौतची प्रत्यक्ष उपस्थिती अपेक्षित आहे. कंगनाच्या टीमने यासाठी असमर्थता व्यक्त करताना ती सध्या शिमला येथे राहात असून प्रवास करणे शक्य नसल्याचे म्हटलंय. तसेच प्रश्नांची उत्तरे ती ईमेलवर देण्यास तयार असल्याचे म्हटलंय.

Kangana Ranaut
कंगना रनौत

By

Published : Jul 24, 2020, 10:08 PM IST

मुंबई - अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी वेगवेगळे दावे करुन चर्चेत आलेली अभिनेत्री कंगना रनौतला तिचे म्हणणे नोंदवण्यासाठी मुंबई पोलीस बोलवणार आहे. कंगनाचे म्हणणे नोंदवून घेणार असल्याच्या वृत्तानंतर आता पोलिस अधिकाऱ्यांनी, तिने पोलीस ठाण्यात प्रत्यक्ष उपस्थित राहून आपले निवेदन सादर करावे अशी मागणी केली आहे.

कंगना सध्या तिचे मूळ गाव शिमला येथे रहात आहे. मुंबई पोलिसांच्या या मागणीला उत्तर देताना कंगनाच्या टीमने असे उत्तर दिले की, कोरोना साथीच्या परिस्थितीत तिला शिमल्याहून मुंबईला येणे शक्य होणार नाही.

कंगनाच्या टीमने पोलिसांना सांगितलंय की तिला सर्व प्रश्न पाठवून द्या, ती या सर्व प्रश्नांची उत्तरे मेलद्वारे सविस्तर देण्यास तयार आहे. यापूर्वी कंगनाने म्हटले होते की तिला जबाब नोंदवायचा आहे, परंतु अद्याप पोलिसांकडून कोणतीही औपचारिक विनंती झालेली नाही.

“कंगनाला कोणतेही औपचारिक समन्स पाठविलेले नाही, रंगोलीला पोलिसांकडून मागील 2 आठवड्यांपासून आकस्मिक कॉल येत आहेत, कंगना यांना निवेदन नोंदवायचे आहे. पण आम्हाला मुंबई पोलिसांकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, येथे रंगोलीने पाठवलेल्या संदेशाचा स्क्रीनशॉट दिला आहे. @ मुंबईपोलीस, "टीम कंगना रनौतने ट्वटरवर लिहिले आहे.

हेही वाचा - दुसऱ्यांच्या मुलींना धमक्या का देता? कंगनाच्या टीमचा जावेद अख्तर यांच्यावर हल्ला बोल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत तपासात चित्रपट समीक्षक राजीव मसंद, दिग्दर्शक-निर्माता संजय लीला भन्साळी, आणि चित्रपट निर्माते आदित्य चोप्रा यांच्यासह 39 जणांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत.

सुशांत हा 14 जून रोजी मुंबईच्या निवासस्थानी मृत अवस्थेत आढळला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details