महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

सुशांत प्रकरण : गायब झाल्याच्या बातम्यांवर सपना पाब्बीने दिली प्रतिक्रिया - Sapna Pabbi latest

सपना पाब्बीला नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने समन्स बजावल्यानंतर सपना पाब्बी कुठेच आढळली नव्हती. त्यामुळे ती गायब झाल्याच्या बातम्या मीडियात येत होत्या. त्यावर सपनाने प्रतिक्रिया दिली असून सध्या ती आपल्या कुटूंबियांसह लंडनमध्ये राहत आहे.

Sapna Pabbi
सपना पाब्बी

By

Published : Oct 23, 2020, 10:13 PM IST

मुंबई - सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी सुरू असलेल्या चौकशीचा एक भाग म्हणून नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने समन्स बजावल्यानंतर सपना पाब्बी गायब झाल्याच्या बातम्या मीडियात येत होत्या. आपण लंडनमध्ये आपल्या घरी कुटुंबासोबत असल्याचे सपनाने म्हटले आहे. २०१९ च्या थ्रिलर 'ड्राइव्ह' या चित्रपटामध्ये तिने सुशांतसोबत काम केले आहे. तिने इंस्टाग्रामवर लोकांना माहिती दिली की, सध्या ती आपल्या कुटूंबियांसह लंडनमध्ये राहत आहे.

सपना पाब्बीने लिहिलंय, "मी गायब झाले आहे असा तर्क मीडिया करीत आहे, हे पाहून वाईट वाटते. मी लंडनमधील माझ्या घरी परत आले आहे आणि माझ्या कुटुंबासमवेत रहात आहे. माझ्या वकीलांनी याबाबत भारतातल्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे, त्यांना मी कुठे आहे हे चांगले ठाऊक आहे. "

या महिन्याच्या सुरुवातीला अभिनेता अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गॅब्रिएला ड्रेमेटिड्सचा भाऊ अ‍ॅगिसियालोस यांच्याशी झालेल्या चौकशीत सपनाचे नाव समोर आले. अ‍ॅगिसियालोसला नुकतीच एनसीबीने अटक केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details