महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'सॅटलाइट शंकर'ची पूर्ण कमाई लष्कराला देणार सुरज पांचोली

चित्रपटात तो एका लष्कर अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात झाली

सुरज लवकरच झळकणार 'सॅटलाइट शंकर' चित्रपटात

By

Published : Mar 23, 2019, 9:34 AM IST

मुंबई- बॉलिवूड अभिनेता सुरज पांचोलीने 'हिरो' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मात्र, त्याचा हा पहिलाच चित्रपट त्याला विशेष प्रसिद्धी मिळवून देण्यात यशस्वी ठरला नाही. यानंतर आता सुरज ‘सॅटलाइट शंकर’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या चित्रपटात तो एका लष्कर अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात झाली असून चीन बॉर्डर जवळील हिमाचल आणि पंजाब येथे चित्रीकरण सुरू आहे. याच परिसरातील एका आर्मी कॅम्पला सूरज पांचोली त्याच्या या चित्रपटाची कमाई मदतनिधी म्हणून देणार असल्याची माहिती एका माध्यामाने दिली आहे.

हा चित्रपट येत्या जुलै महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २०१५ मध्ये आलेल्या हिरो चित्रपटानंतर आता तब्बल ४ वर्षांने सुरज बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार असल्याने त्याच्या या चित्रपटासाठी चाहतेही उत्सुक आहेत. अशात आता हा चित्रपट प्रेक्षकांची मने जिंकण्यात यशस्वी ठरतो का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details