महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

सनी देओलला कोरोनाची बाधा, मनालीत राहतोय एकांतवासात - अभिनेता सनी देओल

अभिनेता सनी देओलला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे तो मनालीमध्ये एकांतवासात राहात आहे.

Sunny Deol
सनी देओल

By

Published : Dec 2, 2020, 4:41 PM IST

मुंबई- अभिनेता, खासदार सनी देओल यांनी बुधवारी सांगितले की त्यांची कोरोनव्हायरस चाचणी पॉझिटिव्ह आली आहे आणि तो एकांतवासात राहात आहे. सनीने ट्विटरवरुन ही बातमी शेअर केली आहे की, "माझी कोरोना टेस्ट झाली आहे आणि अहवाल परत पॉझिटिव्ह आला आहे. मी एकांतवासात आहे आणि मी ठीक आहे. कृपया स्वतःला आयसोलेट करा आणि कोरोनाची चाचणी करा.''

हेही वाचा - योगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावर, वातावरण तापले; मनसे, शिवसेना, काँग्रेसकडून लक्ष्य

एका निवेदनानुसार, मुंबईत परत येण्यापूर्वी सनीने हिमाचल प्रदेशातील मनाली येथे स्वत: ची चाचणी घेतली होती. त्यात म्हटले आहे की, "त्याची चाचणी सकारात्मक झाली परंतु त्यांना विषाणूची कोणतीही लक्षणे नाहीत आणि ते ठीक आहेत. पूर्ण बरे होईपर्यंत तो मनालीत होम क्वारेन्टाईनमध्येच राहील. अधिकाऱ्यांनी दिलेल्या सर्व सूचनांचे पालन आणि आवश्यक दक्षता पाळत आहे."

हेही वाचा - रकुलप्रीत सिंहने फ्लाईंग बोर्डवरील फोटो केले शेअर, चाहत्यांचा उत्सफुर्त प्रतिसाद

काही महिन्यांपूर्वी खांद्याच्या शस्त्रक्रियेनंतर 64 वर्षीय स्टार सनी देओल मनालीला गेला होता. कारण डॉक्टरांनी त्याला एकांतात राहण्याचा सल्ला दिला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details