मुंबई - बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी याने वर्सोवा पोलिस ठाण्यांमध्ये बालाजी मीडिया फिल्म्स प्रायव्हेट लिमिटेडच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. विनिता या चित्रपटांमध्ये सुनील शेट्टी याच्या संमतीशिवाय त्याचा फोटो वापरण्यात आलेला असून याद्वारे नागरिकांकडून पैसासुद्धा वसूल केला जात असल्याची तक्रार सुनील शेट्टी यांनी वर्सोवा पोलिस ठाण्यामध्ये केली आहे.
काय म्हटले आहे सुनील शेट्टीने तक्रारीत?
या संदर्भात सुनील शेट्टी यांनी म्हटले आहे की मला या चित्रपटाबद्दल कुठलीही माहिती नसून हा चित्रपट कोणी बनवला आणि ही माणसं कोण आहेत त्याच्या बद्दलची माहिती माझ्याकडे नाही. मात्र , असं असताना सुद्धा माझ्या संमतीशिवाय या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये माझा फोटो वापरण्यात आलेला आहे व त्याद्वारे नागरिकांकडून पैसेसुद्धा घेतले गेल्याचं मला कळल्यानंतर यासंदर्भात मी पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे.