मुंबई- तापसी पन्नू आणि अमिताभ बच्चन यांच्या मुख्य भूमिका असलेला 'बदला' चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. सस्पेन्स थ्रिलर असलेल्या या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. आता या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर यशस्वी ५० दिवस पूर्ण केले आहेत.
'बदला'चे यशस्वी ५० दिवस, शाहरूखने अमिताभ आणि तापसीचं केलं अभिनंदन - amitabh bachchan
सुजोय घोष यांचं दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाची निर्मिती गौरी खान, सुनीर आणि अक्षय पुरी यांनी केली आहे
शाहरूखने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करत चित्रपटाला मिळत असलेल्या या प्रतिसादाबद्दल तापसी पन्नू, अमिताभ बच्चन आणि सुजोय घोष यांचे अभिनंदन केले आहे. प्रदर्शनानंतर पाचव्या आठवड्यात चित्रपटाने १०० कोटींचा गल्ला पार केला असून अजूनही चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
सुजोय घोष यांचं दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाची निर्मिती गौरी खान, सुनीर आणि अक्षय पुरी यांनी केली आहे. तापसी आणि अमिताभ यांनी याआधीही 'पिंक' चित्रपटात स्क्रीन शेअर केली होती. विशेष म्हणजे या चित्रपटातही अमिताभ वकिलाच्या भूमिकेत होते आणि बदलामध्येही त्यांनी वकिलाची भूमिका साकारली आहे.