महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'इंडियाज मोस्ट वॉन्टेड'च्या स्क्रिनिंगला 'या' कलाकारांची हजेरी, बोनी कपूर म्हणतात... - arjun kapoor

अर्जून कपूरच्या 'इंडियाज मोस्ट वॉन्टेड' चित्रपटाचं स्पेशल स्क्रिनिंग नुकतंच पार पडलं. अनेक कलाकारांनी या स्क्रिनिंगला हजेरी लावली. यावेळी जावेद अख्तर यांनी अर्जूनच्या अभिनयाचं विशेष कौतुक केलं

'इंडियाज मोस्ट वॉन्टेड'चं स्पेशल स्क्रिनिंग

By

Published : May 17, 2019, 8:37 AM IST

मुंबई - अर्जून कपूर लवकरच 'इंडियाज मोस्ट वॉन्टेड' चित्रपटातून पुन्हा एकदा पडद्यावर झळकणार आहे. हा चित्रपट २४ मे रोजी चित्रपटगृहे गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरपासून ट्रेलरपर्यंत सगळ्यालाच प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला.

चित्रपटाच्या स्क्रिनिंगला एक आठवडा बाकी असतानाच अर्जून कपूर आणि निर्मात्यांनी या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगचे आयोजन केले. गुरूवारी रात्री या चित्रपटाचं स्पेशल स्क्रिनिंग झालं. या स्क्रिनिंगला बोनी कपूर, जावेद अख्तर, मलायका अरोरा, संजय कपूर, महिप कपूर, अंशुला कपूर, खुशी कपूर, सोनम कपूर यांच्यासह वरूण धवन, नताशा दलाल आणि करण जोहर यांनीही हजेरी लावली.

स्क्रिनिंग पार पडल्यानंतर या चित्रपटाबद्दल विचारले असता जावेद अख्तर यांनी अर्जूनच्या अभिनयाचे कौतुक केले. तर बोनी कपूर यांना विचारले असता, मी बाप आहे त्यामुळे मी काहीही उत्तर दिलं, तरी ते त्याचं कौतुक केल्यासारखं होईल. मात्र, चित्रपट खरंच खूप चांगला आणि वास्तववादी आहे, असे म्हणत बोनी कपूर यांनी आपल्याकडून या चित्रपटाला ५ स्टार असल्याचे म्हटले.

ABOUT THE AUTHOR

...view details