महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'पाकिस्तानमध्ये निघून जा' म्हणणाऱ्यांना सोनम कपूरनं 'असं' दिलं उत्तर

सोनम कपूरला पाकिस्तानात निघून जाण्याचा सल्ला देणाऱ्या ट्रोलर्सना तिने शांतपणे सडेतोड उत्तर दिलंय.

सोनम कपूर

By

Published : Aug 19, 2019, 7:22 PM IST

Updated : Aug 19, 2019, 7:30 PM IST

मुंबई - अभिनेत्री सोनम कपूरने अलिकडेच जम्मू काश्मीरमध्ये असलेल्या परिस्थितीबद्दल भाष्य केले होते. यानंतर तिच्यावर टीका सुरू झाली. ट्रोल टोळीने तर तिला चक्क पाकिस्तानात निघून जाण्याचा सल्ला दिला. सोनम कपूरने मात्र याला सडेतोड उत्तर देऊन ट्रोलकऱ्यांना शिंगावर घेतलंय.

सोनमने ट्विटरवर आपल्या प्रतिक्रिया लिहिली आहे.''मित्रांनो कृपया शांत व्हा .. एखाद्याला काय म्हणायचे आहे, तुम्ही त्यातून काय अर्थ काढता याचा म्हणणाऱ्यावर परिणाम होत नाही, तर तर्क लावणाऱ्यावर होतो. त्यामुळे तुम्ही कोण आहात हे ओळखा आणि मग तुमचं तुम्हालाच कळेल,'' अशा आशयाचे ट्विट तिने केले आहे.

माध्यमाशी दिलेल्या मुलाखतीत सोनमने जम्मू काश्मीर विषयी आपली मते व्यक्त केली होती. ती म्हणाली होती, ''मला वाटते ही गोष्ट खूप किचकट आहे आणि ज्या बातम्या येत आहेत त्यात किती तथ्य आहे हे मला माहिती नाही. सर्व काही शांततेत सुरू असेल आणि काय सुरू आहे हे समजेल अशी मी आशा करते. जेव्हा माझ्याकडे संपूर्ण माहिती येईल तेव्हा मी माझे मत सांगू शकेन.

''मी अर्धी सिंधी आणि अर्धी पेशवारी आहे. माझ्या संस्कृतीचा एक भाग पाहणे हे मला फार वाईट वाटते'', असेही ती पुढे म्हणाली होती. नेमक्या या गोष्टीवरुन ट्रोल करणारे तिच्यावर तुटून पडले.

बॉलिवूड चित्रपटांना पाकिस्तानने बंदी घातल्याच्या मुद्द्यावर सोनम म्हणाली, ''नीरजा पाकिस्तानात प्रदर्शित होऊ शकला नाही, कारण विमान अपहरण करून ते पाकिस्तानात कराचीला नेण्यात आले होते. एक कलाकार म्हणून तुम्ही सर्वत्र प्रतिनिधीत्व केले जावे आणि तुमचे काम सगळीकडे पाहिले जावे, असे वाटते. चित्रपटात कुठेही पाकिस्तानाला नकारात्मक दाखवले नव्हते, तरीही त्यांनी चित्रपटाला पाकिस्तानात रिलीज होऊ दिले नाही याचे वाईट वाटते.''

कामाच्या पातळीवर सोनम कपूर सध्या 'द झोया फॅक्टर' या चित्रपटात काम करीत आहे. या चित्रपटात दलकेर सलमान याच्यासोबत तिची जोडी पडद्यावर पाहायला मिळेल.

Last Updated : Aug 19, 2019, 7:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details