मुंबई- कोरोनामुळे गेल्या अनेक दिवसांपासून देशभरात लॉकडाऊन जाहीर केला गेला आहे. यादरम्यान आंतरराष्ट्रीय उड्डाणे अद्यापही बंद आहेत. अशात अभिनेत्री सोनम कपूर प्रवास करण्यासाठी प्रचंड उत्सुक असल्याचं दिसत आहे. अभिनेत्रीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन विमानतळावरील आपला एक जूना फोटो शेअर केला आहे.
लॉकडाऊन इफेक्ट: सोनम कपूरला विमान प्रवास करण्याची इच्छा, फोटो केला शेअर - सोनू कपूर बातमी
अभिनेत्रीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन विमानतळावरील आपला एक जूना फोटो शेअर केला आहे. या फोटोला दिलेल्या कॅप्शनवरुन सोनम लवकरच कुठेतरी जाण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे. फोटोला सोनमने कॅप्शन दिले आहे, की माझ्या सगळ्या बॅग पॅक झाल्या आहेत आणि मी जायला तयार आहे
या फोटोला दिलेल्या कॅप्शनवरुन सोनम लवकरच कुठेतरी जाण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे. फोटोला सोनमने कॅप्शन दिले आहे, की माझ्या सगळ्या बॅग पॅक झाल्या आहेत आणि मी जायला तयार आहे, कुठेतरी, कोठेही, असं तिनं म्हटलं आहे.
तिच्या या पोस्टला काही तासातच अनेक लाईक मिळाले आहेत. मागील महिन्यात सोनम कपूरने पती आनंद अहूजासोबत लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा केला. यावेळी सोनमने पतीसाठी सोशल मीडियावर एक इमोशनल पोस्टदेखील लिहिली होती. ही जोडी अनेकदा एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत असते.